नवी दिल्लीः नोकियाचा पहिला ५ जी स्मार्टफोनसह कंपनीने आणखी दोन फोन लाँच केले आहेत. आणि हे दोन फोन लाँच केले आहेत. नोकिया फोन बनवणारी कंपनी एचएमडी ग्लोबलने एका ऑनलाइन कार्यक्रमात हे फोन लाँच केले आहेत. Nokia 5.3 स्मार्टफोन हा फोन नोकियाचा ५.१ चे अपग्रेडेड व्हर्जन आहे. नोकियाचा हा स्मार्टफोन मिड प्राइस रेंजमध्ये आला आहे. तर Nokia 1.3 एक बजेटमधील स्मार्टफोन आहे. हा फोन Android Go सोबत आला आहे. Nokia 5.3 आणि Nokia 1.3 ची किंमत Nokia 5.3 हा स्मार्टफोन ३ स्टोरेजमध्ये आला आहे. या फोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या फोनच्या किंमतीची घोषणा करण्यात आली आहे. या फोनची किंमत १८९ यूरो म्हणजेच जवळपास १५ हजार रुपये आहे. तर Nokia 1.3 ची किंमत ९५ यूरो म्हणजेच ७ हजार ६०० रुपये किंमत आहे. नोकियाचे हे दोन्ही स्मार्टफोन एप्रिलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. नोकिया ५.३ स्मार्टफोन साइयन, सँड आणि चारकोल या रंगात उपलब्ध करण्यात आले आहेत. तर नोकिया १.३ सुद्धा याच रंगात उपलब्ध करण्यात आले आहेत. Nokia 5.3 ची खास वैशिष्ट्ये नोकिया ५.३ स्मार्टफोनमध्ये ६.५५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचा ऑस्पेक्ट रेशिओ २०:९ आहे. नोकिया ५.३ मध्ये ड्युअल सिम सपोर्ट आहे. हा फोन अँड्रॉयड १० आउट ऑफ द बॉक्सवर चालतो. फोनमध्ये टॉपला २.५ डी ग्लास आणि वॉटरड्रॉप नॉच दिला आहे. हा स्मार्टफोन ६ जीबी रॅम पर्यायात आहे. फोनमध्ये १२८ जीबी स्टोरेजपर्यंत ऑप्शन आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने या फोनचा स्टोरेज ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकतो. नोकिया ५.३ स्मार्टफोन अनलिमिटेड गुगल ड्राइव्ह स्टोरेज सोबत आला आहे. या फोनमध्ये रियरमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या बॅकला ४ कॅमेरे दिले आहेत. फोनच्या मागे १३ मेगापिक्सलचा, ५ मेगापिक्सलचा, अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, २ मेगापिक्लचा मायक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. कॅमेऱ्यात अॅप नाइट मोड, पोर्ट्रेट मोड आणि एआय सीन डिटेक्शन यासारखे फीचर्स दिले आहेत. फोनमध्ये रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. फोनमध्ये ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QtAWCM
Comments
Post a Comment