करोनाः गेट्स फाउंडेशन देणार १० कोटी डॉलर

नवी दिल्लीः मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स यांनी एक मोठी घोषणा केली आहे. जगभरातील करोना व्हायरसला रोखण्यासाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. बिल गेट्स यांचे आर्थिक मदत म्हणून तब्बल १० कोटी डॉलर देणार आहे. तसेच या १० कोटी डॉलर शिवाय वॉशिंग्टनच्या मदतीसाठी आणखी ५० लाख डॉलर देणार असल्याची घोषणा बिल गेट्स यांनी केली आहे. करोनाला हरवण्यासाठी सर्वांनी जागरूक राहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. बिल गेट्स यांनी सोशल साइट रेडिट वर युजरने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले तपासासाठी शहर आणि संस्था बंद केली जात असेल तर काहीच हरकत नाही. याचा फायदा म्हणजे, लोकांनी घराबाहेर पडू नये, याचा नक्कीच फायदा होईल,, करोनाच्या रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत होईल, सामाजिक रुपाने वेगळे राहण्याची पद्धत ही यशस्वी होत असल्याचेही त्यांनी म्हटले. संपूर्ण जगभरात आर्थिक नुकसान होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. विकसनशील देशांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. कारण, हे देश श्रीमंत देशांप्रमाणे सामाजिक वेगळेपण करू शकत नाही. तसेच या देशात हॉस्पिटलची कमतरता आणि त्यांची क्षमता कमी असते, असे ते म्हणाले.


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3a7SP1s

Comments

clue frame