जिओचा 'वर्क फ्रॉम होम' पॅक; १०२ जीबी डेटा

नवी दिल्लीः करोना व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लोकांना घरात थांबण्यास सांगितले आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून देशातील अनेक कंपन्यांचे कर्मचारी करीत आहेत. रिलायनस जिओने या लोकांसाठी आता वर्क फ्रॉम होम पॅक आणला आहे. या पॅकची किंमत २५१ रुपये आहे. जिओने या रिचार्ज पॅकला '' असे नाव दिले आहे. जिओच्या रिचार्जमध्ये २५१ रुपयांत ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा मिळणार आहे. २ जीबी डेटा वैधता संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होईल. म्हणजेच ६४ kbps च्या कमी स्पीडसह ग्राहकांना इंटरनेट मिळू शकणार आहे. या पॅकची वैधता ५१ दिवस आहे. या पॅकमध्ये कंपनीने व्हाईस कॉल आणि एसएमएस ची सुविधा दिली नाही. सध्या करोना व्हायरसमुळे सर्व कॉर्पोरेट कंपन्या, ऑफिसने आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले आहे. वर्क फ्रॉम होम मुळे गर्दी कमी होईल. आणि पर्यायाने करोनाला रोखण्यास मदत होईल. याआधी देशात सर्वात मोठ्या कंपन्यापैकी एक असलेल्या जिओने काही ठिकाणी डेटा व्हाऊचर अपग्रेड केले होते. यात जास्त डेटा आणि दुसऱ्या नेटवर्कवर फ्री डेटा कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. ४ जीबी डेटा व्हाउचर ग्राहका त्याचवेळी रिचार्ज करू शकतो, ज्यावेळी त्याचा पहिला एक प्लान अॅक्टिव असेल. तसेच जिओने लेटेस्ट ४ जी जिओ प्रिपेड डेटा व्हाऊचर्स आता ११ रुपये, २१ रुपये, ५१ रुपये आणि १०१ रुपये आणले आहेत. यात अनुक्रमे ८०० एमबी, २ जीबी, ६ जीबी, आणि १२ जीबी हायस्पीड डेटा मिळतो. या व्हाऊचर्समध्ये नॉन जिओ नेटवर्कवर अनुक्रमे, ७५, २००, ५०० आणि १०० मिनिट कॉलिंग करण्याची सुविधा आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Ur0mCb

Comments

clue frame