एअरटेलची मोठी घोषणा, ८ कोटी युजर्संना १० ₹ चा टॉकटाइम फ्री

नवी दिल्लीः करोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनच्या काळात आपल्या युजर्संना चांगली भेट देता यावी यासाठी भारती कंपनीने युजर्संना फ्री मध्ये १० रुपयांचा टॉकटाइम देण्याची घोषणा केली आहे. तसेच कंपनीने नंबर्सची वैधता १७ एप्रिल पर्यंत वाढवली आहे. एअरटेलच्या या दोन्ही सुविधांचा फायदा कंपनीच्या ८ कोटी ग्राहकांना होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तसेच या घोषणेनंतर १७ एप्रिल पर्यंत ग्राहकांना फ्री इनकमिंग मिळणार आहे. यासाठी ग्राहकांना वैधता (व्हेलिडिटी) रिचार्ज करण्याची गरज नाही. एअरटेलने ही सुविधा आपल्या ८ कोटी ग्राहकांसाठी दिली आहे. जे लोक कमी रिचार्ज करतात. किंवा जे ग्राहक नेहमी वैधता रिचार्ज करतात. करोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात गरीब एअरटेल युजर्संना याचा फायदा नक्की मिळणार आहे. या ऑफरची सुरुवात करण्यात आली आहे. हळू हळू सर्व ८ कोटी ग्राहकांच्या अकाउंटवर १० रुपयांचा टॉकटाइम बॅलेन्स जमा होईल. कोणताही ग्राहक आपल्या कुटुंबासोबत बोलण्यापासून वंचित राहू नये. कुटुंबासोबत तो जोडला जावा यासाठी कंपनीने हे पाऊल उचललं आहे. ४८ तासात लोकांच्या अकाउंटमध्ये १० रुपयांचे बॅलेन्स जमा होईल, असे कंपनीने सांगितले. दरम्यान, सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आपल्या प्रीपेड सब्सक्रायबर्ससाठी दोन नवीन ऑफर्सची घोषणा केली आहे. बीएसएनएलने २० एप्रिल २०२० पर्यंत आपल्या रिचार्जची वैधता वाढवली आहे. तसेच कंपनी कोणतेही पैसे वसुल न करता ग्राहकांना १० रुपयांचा टॉकटाइम फ्रीमध्ये देणार आहे. बीएसएनएलच्या या निर्णयामुळे कंपनीच्या ग्राहकांना करोना व्हायरसच्या लॉकडाऊन दरम्यान कोणत्याही प्रकारचे संकट झेलावे लागणार नाही. त्यांची सेवा सुरू राहणार आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39s0V3X

Comments

clue frame