लॉकडाऊनः सोनी, झी टीव्ही, कलर्सचे 'हे' चॅनेल फ्री

नवी दिल्लीः करोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात सुरू आहे. सर्व लोक आपापल्या घरात बसलेले आहे. लोकांनी घरातच बसावे यासाठी म्हणजेच () ने डीटीएच आणि केबल नेटवर्कला निवडक चॅनेल दोन महिन्यांसाठी मोफत दाखवण्याचे आदेश दिले आहेत. या चॅनेलमध्ये सोनी पल, कलर्स रिश्ते आणि झी अनमोल या चॅनेलचा समावेश आहे. याआधी टाटा स्कायने आपल्या युजर्संसाठी फिटनेस चॅनेल फ्री उपलब्ध केले आहे. आयबीएफने म्हटलेय, लॉकडाऊन दरम्यान सोनी वेटवर्कचे सोनी पल, झी टीव्हीचे झी अनमोल आणि कलर चॅनेलचे कलर्स रिश्ते हे चॅनेल दोन महिन्यांसाठी फ्रीमध्ये दाखवा. सोनी पल या चॅनेलची किंमत १ रुपया, स्टार उत्सवची किंमत १ रुपया आणि झी अनमोलची किंमत ०.१ रुपया होती. तर दुसरीकडे कलरने कलर रिश्ते चॅनेलची किंमत १ रुपया ठेवली होती. टाटा स्कायचा फीटनेस चॅनेल युजर्ससाठी फ्रीमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. हे चॅनेल ११० नंबरवर दिसते. या चॅनेलचे मोबाइल अॅपवर तसेच टीव्ही व्हिडिओवर पाहिले जावू शकते. या आधी कंपनी युजर्संकडन या चॅनेलसाठी २ रुपये प्रतिदिन या प्रमाणे पैसे वसूल करीत होती.


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3awFMam

Comments

clue frame