स्मार्टफोनवर जिवंत राहू शकतो करोना व्हायरस, नव्या अभ्यासात माहिती उघड

नवी दिल्लीः सध्या स्मार्टफोन सर्वात जास्त वापरले जाणारे गॅझेट आहे. स्मार्टफोनला दिवसभरात अनेक ठिकाणी ठेवले जाते. शरीराच्या अनेक भागांना मोबाइलचा संपर्क होत असतो. सध्या जगभरात करोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या वेगाने पसरत आहे. त्यामुळे स्मार्टफोनवर किती वेळ राहू शकतो, याची माहितीही अनेकांकडून विचारली जात आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या एका अभ्यासानुसार, ओरिजनल SARS-CoV एक ग्लास सर्फेसवर ९६ तास म्हणजेच ४ दिवस जिवंत राहू शकतो. सार्स व्हायरस २००३ मध्ये आला होता. ग्लास शिवाय हा व्हायरस प्लास्टिक आणि स्टिलवर जवळपास ७२ तास (३ दिवस) जिवंत राहू शकतो. याच अभ्यासात माहिती उघड झाली की, नॉवल करोना व्हायरस एक कार्डबोर्ड वर २४ तास आणि कॉपर वर ४ तास जिवंत राहू शकतो. आता या संस्थेच्या एका नव्या अभ्यासातून ही माहिती समोर आली की, हा व्हायरस ग्लासवर किती दिवस जिवंत राहू शकतो. तर दुसऱ्या प्रकारे पाहिले तर हे संकेत मिळतात की, करोनाही सोर्स प्रमाणे याच प्रकारे ग्लास सर्फेसवर ४ दिवस जिवंत राहू शकतो. २००३ मध्ये WHO आणि या महिन्यात आलेल्या NIH च्या स्टडीमध्ये हा अंदाज बांधला गेला आहे की, नॉवल करोना व्हायसर ग्लास सर्फेसवर ९६ तास म्हणजेच ४ दिवस जिवंत राहू शकतो. सध्या स्मार्टफोन्सवरील ग्लास हे पॅनेलसोबत येतात. त्यामुळे हे म्हटले जावू शकते की, करोना व्हायरस एका स्मार्टफोनवर ४ दिवस जिवंत राहू शकतो. केवळ स्मार्टफोनवर नाही तर कोणत्याही गॅझेटवर जसे, स्मार्टफोन, स्मार्टवॉच, टॅबलेट किंवा लॅपटॉपवर. सध्या स्मार्टफोनचा सर्वात जास्त वापर होतो. त्यामुळे स्मार्टफोनवर करोना व्हायरसचे जंतू बसणार नाही. याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. स्मार्टफोनला साफ करणे महत्वाचे आहे. सॉल्यूशनमुळे फोनचा डिस्प्ले खराब होऊ शकतो. त्यामुळे स्क्रीन प्रोटेक्टचा वापर करता येवू शकतो.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2UvIl6Y

Comments

clue frame