नवी दिल्लीः करोनामुळे जगभरात भीती पसरली असताना आता चीनमधून आलेल्या करोनाचा फटका उद्योगधंदे आणि उत्पादनाच्या विक्रीला मोठ्या प्रमाणात बसू लागल्याचे दिसत आहे. करोनामुळे आयफोनचे उत्पादन आणि विक्रीवर याचा थेट परिणाम झाला असून करोनामुळे अॅपलला आपले अनेक स्टोर्स आणि मॅन्यूफॅक्चरिंग युनिट्स बंद करावे लागले आहेत. त्यामुळे कंपनीने आयफोनच्या ऑनलाइन खरेदीवर बंदी आणली आहे. कंपनीने घेतलेल्या नवीन निर्णयामुळे ग्राहकांना आता एका मॉडेलचे केवळ दोन आयफोन खरेदी करता येवू शकणार आहेत. त्यापेक्षा जास्त आयफोनची खरेदी करता येणार नाही. परंतु, वेगवेगळे मॉडेलचे दोन पेक्षा जास्त फोनची खरेदी करता येवू शकते. सध्या ही मर्यादा अमेरिका आणि चीनसह काही देशात लागू करण्यात आली आहे. शुक्रवारपासून याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. २००७ मध्ये आयफोनच्या बाजारात अॅपलने पहिल्यांदा खरेदीवर अशी बंदी घातली होती. आयफोनची साठेमारी होऊ नये म्हणून कंपनीने हा निर्णय घेतला होता. अनेक देशात अॅपलच्या वेबसाइटवर ड्रॉप-डाउन मेन्यू द्वार ग्राहकांना एकाच मॉडेलचे दोन हून अधिक आयफोन खरेदी करण्यापासून रोखण्यात येत आहे. ही खरेदीची मर्यादा आयफोनच्या सर्व मॉडेल्सवर लागू करण्यात आली आहे. चीन, हाँगकाँ, तायवान आणि सिंगापूरमध्ये आयफोन लिस्टिंगमधून ग्राहकांना ही माहिती पाठवली जात आहे. परंतु, अद्याप कंपनीकडून याची अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Uwua0i
Comments
Post a Comment