लॉकडाऊनः व्हॉट्सअॅप स्टेट्सचा 'हा' नियम बदलला

नवी दिल्लीः करोना व्हायरसमुळे देशभरात करण्यात आले आहे. हा लॉकडाऊन १४ एप्रिल पर्यंत असणार आहे. घराबाहेर पडण्यास लोकांना मनाई करण्यात आल्यानंतर लोकांनी सोशल मीडियाचा अधिक वापर करायला सुरुवात केली आहे. लॉकडाऊनच्या काळात व्हॉट्सअॅपने आपल्या स्टेट्समध्ये मोठा बदल केला आहे. इंटरनेटचा जास्त वापर होऊ नये, बचत व्हावी यासाठी भारतात व्हॉट्सअॅप कंपनीने मध्ये बदल केला आहे. आता युजर्सं पहिल्यांदा ३० सेकंदचा व्हिडिओ लावू शकणार नाहीत. कंपनीने आता हे व्हॉट्सअॅप स्टेट्स १५ सेकंदाचा केला आहे. युजर्संना व्हिडिओ लावायचा असल्यास ते केवळ १५ सेकंदाचा लावू शकतील. व्हॉट्सअॅप स्टेट्सला भारतात प्रचंड मागणी आहे. अनेकांचे हे आवडते फीचर आहे. ज्याचा दिवसभरात सर्वात जास्त वापर केला जातो. व्हॉट्सअॅपने स्टेट्समध्ये बदल केल्याची माहीत WABtainfo ने दिली आहे. व्हॉट्सअॅप स्टेट्सवर आता केवळ १५ सेकंदाचा व्हिडिओ लावता येणार आहे. सर्व्हर इन्फ्रास्ट्रक्चरवरील ट्रॅफिक कमी करण्यासाठी कंपनीने हे महत्त्वाचे पाऊल उचललं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, भारतात व्हॉट्सअॅपचे जवळपास ४०० मिलियन अॅक्टिव युजर्स आहेत. भारतात या फीचर्सला सर्वात जास्त मागणी आहे. जर जर कुणी ३० सेकंदाचा व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करीत असेल तर तो आता होणार नाही. करोना व्हायरसला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. हा लॉकडाऊन १४ एप्रिलच्या मध्यरात्री नंतर संपणार आहे. त्यामुळे घरात राहणाऱ्या लोकांकडून सोशल मीडियावर व व्हॉट्सअॅपवरचा वापर वाढला आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39vBdvm

Comments

clue frame