मस्तच! जिओने ATM मधून सुरू केली रिचार्ज सेवा

नवी दिल्लीः भारतात सध्या २१ दिवसांचा लॉकडाऊन असल्याने अनेकांना फटका बसला आहे. अनेक दुकानं बंद आहेत. जिओने आपल्या ग्राहकांना रिचार्ज करण्याची अडचण निर्माण होवू नये, यासाठी 'ATM Recharge'सेवा सुरू केली आहे. रिचार्ज करण्याची दुकाने बंद असले तरी जिओच्या ग्राहकांना एटीएम मध्ये जाऊन आपला मोबाइल रिचार्ज करता येवू शकणार आहे. रिचार्ज करताना कोणत्याही ओटीपीची गरज लागणार नाही. रिलायन्स जिओने या संदर्भात एक ट्विट केले आहे. ग्राहकांना एटीएम मधून जिओ रिचार्ज करता येवू शकणार आहे. जिओने ज्या बँकेच्या एटीएममध्ये ही सेवा सुरू केली आहे. या बँकेच्या एटीएमची नावे पुढीलप्रमाणे आहेत. AUF Bank, Axis Bank, DCB Bank, HDFC Bank, ICICI Bank, IDBI Bank, IDFC Bank, Standard Chartered Bank आणि State Bank of India या ठिकाणी जिओ ग्राहकांना रिचार्ज करता येवू शकणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, या बँकांची १००००० हून अधिक ऑन साइट आणि ऑफ साइट ATM आहेत. जर तुम्हीही जिओचे ग्राहक असाल तर खाली सांगितल्याप्रमाणे एटीएममधून रिचार्ज करू शकता. 1. सर्वात आधी आपला डेबिट किंवा क्रेडिट कार्ट एटीएम मशीनमध्ये टाका 2. आता मेन्यूमध्ये रिचार्ज पर्यायावर टॅप करा 3. आता आपला जिओ मोबाइल नंबर टाका. ज्याला रिचार्ज करायचे आहे. 4. नंबर डायल केल्यानंतर 'OK/Enter' बटन दाबा. 5. त्यानंतर तुम्हाला तुमचा ATM PIN टाकावा लागेल. 6. आता किती रुपयांचा रिचार्ज करायचा आहे. ती रक्कम टाका. 7. आता ATM मशीनच्या स्क्रीवर तुम्हाला रिचार्जचा मेसेज दिसेल. तसेच तुमच्या अकाउंटमधून रिचार्जचे पैसे डेबिट होतील. त्यानंतर तुम्हाला जिओ मोबाइल नंबरवर रिचार्ज झाल्याचा मेसेज येईल.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3awCpjt

Comments

clue frame