नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी ऑनरने आपला स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. याआधी ऑनरने ९ ए आमि ३० एस हे फोन लाँच केले होते. युजर्संना या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी ३५ चिपसेट, १३ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ३ जीबी रॅमचा सपोर्ट मिळणार आहे. कंपनीने हा स्मार्टफोन भारतात कधी लाँच करणार आहे, याविषयी अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. Honor 8A Prime ची किंमत कंपनीने ऑनर ८ए प्राईमचा ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टेरोजचा स्मार्टफोन बाजारात लाँच केला आहे. या फोनची किंमत ९ हजार ६०० रुपये आहे. हा फोन ब्लू, ग्रीन आणि मिडनाइट ब्लॅक या तीन रंगात उपलब्ध केला आहे. Honor 8A Prime खास वैशिष्ट्ये या फोनमध्ये ६.८ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन ७२०x१५६० पिक्सल आहे. तसेच कंपनीने या फोनमध्ये ३ जीबी रॅम प्लस ३२ स्टोरेजसह मीडियाटेक हीलियो पी ३५ एसओसीचा सपोर्ट दिला आहे. हा फोन अँड्रॉयडवर ईएमयूआय ९.० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार आहे. Honor 8A Prime चा कॅमेरा युजर्संना या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा सिंगल कॅमेरा मिळणार आहे. तर फ्रंटला ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. या फोनच्या कॅमेऱ्याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हा फुल एचडी रिझॉल्यूशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. Honor 8A Prime ची बॅटरी कंपनीने या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ४ जी एलटीई, जीपीएस, ग्लोनेस, वायफाय, ब्लूटूथ आणि यूएसबी पोर्ट यासारखे फीचर दिले आहेत. तसेच फोनमध्ये ३०२० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2UyGZIH
Comments
Post a Comment