नवी दिल्लीः भारताचा पहिला ५ जी स्मार्टफोन 5G आज भारतात लाँच होणार आहे. या आधी हा फोन बार्सिलोनामध्ये वर्ल्ड काँग्रेस (MWC) मध्ये लाँच करण्यात येणार होता. परंतु, करोना व्हायरसच्या भीतीने करण्यात आला नाही. आज दुपारी २.३० वाजता या फोनची लाँचिंग होणार आहे. कंपनीच्या यूट्यूब चॅनेलवर हा कार्यक्रम पाहता येणार आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ५ जी चा सपोर्ट देण्यात आला आहे. Realme X50 Pro फोन भारतातील पहिला 5G स्मार्टफोन असला तरी भारतात ५ जी कनेक्टिविटी सुरू होण्यास अजून बराच वेळ लागणार आहे. फोनची लाँचिंग आज दुपारी नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासंदर्भातील निमंत्रण मीडियांना या आधीच पाठवण्यात आले आहेत. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमच्या फ्लॅगशीप प्रोसेसर स्नॅपड्रॅगन ८६५ सह देण्यात येणार आहे. तसेच या फोनमध्ये १२ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंत UFS 3.0 स्टोरेज दिला जाणार आहे. हा फोन अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार आहे. फोनमध्ये ६५ वॅटची सुपर डर्ट चार्ज टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. या फोनची किंमत भारतात ५० हजार रुपये असण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंतचा सर्वात महागडा फोन ठरण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. ६ कॅमेरे असल्याचे सांगण्यात येत आहेत. यात ६४ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. तसेच फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो. फोनच्या टीझरवरून यात ड्युअल सेल्फी कॅमेरा असणार आहे. रियलमी एक्स२ प्रो मध्ये २०एक्स हायब्रिड झूम फीचर दिले जाण्याची शक्यता आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TcfvX5
Comments
Post a Comment