जिओच्या या 'स्वस्त' प्लानमध्ये ४.५ TB डेटा

नवी दिल्लीः रिलायन्स जिओने सेलुलरनंतर आपाली ब्रॉडबँड सेवा सुरू केली आहे. जिओ फायबरच्या नावाने सुरू केलेल्या या प्लानमध्ये ग्राहकांना जबरदस्त ऑफर दिली जात आहे. जिओ फायबर ला लाँचिंग करून वर्ष झाले असून ५० मिलियन म्हणजेच ५ कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य रिलायन्स जिओने ठेवले आहे. त्यासाठी कंपनीने अनेक स्वस्त प्लान लाँच केले आहेत. या प्लानपैकी एक प्लान म्हणजे १९९ रुपयांचा प्लान आहे. जिओ फायबरचा हा प्लान आठवड्याचा प्लान आहे. या प्लानमध्ये ५ टीबी पर्यंत डेटा ग्राहकांना वापरता येऊ शकतो. या प्लानमध्ये १ टीबी डेटा मिळतो. परंतु, जर हा प्लान पाचवेळा रिचार्ज केला तर ग्राहकांना ३५ दिवसांत १ हजार १७० रुपये खर्च करावे लागतील. या रुपयात ग्राहकांना ५ टीबीपर्यंत डेटा मिळू शकतो. १९९ रुपयांच्या या प्लानचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या प्लानमध्ये १०० Mbps ची स्पीड मिळते. तसेच दुसरा फायदा म्हणजे महिन्याला एफयूपी डेटा संपल्यानंतरही इंटरनेटचा वापर करता येऊ शकतो. १९९ रुपयांचा हा प्लान जिओ फायबरचा सर्वात स्वस्त प्लान आहे. कारण, कोणत्याही महिन्याच्या प्लानमध्ये इतका मोठा डेटा मिळत नाही. जर १२९९ रुपयांचा गोल्ड प्लान ग्राहकांनी घेतली तर १८ टक्के जीएसटी ग्राहकांना द्यावा लागतो. त्यानंतर केवळ ७५० जीबी टेडा ग्राहकांना मिळतो. तसेच २५० Mbps च्या स्पीडने नेट मिळते. म्हणजेच हा प्लान सर्वात स्वस्त व वेगवान प्लान आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2vNz9AI

Comments

clue frame