नवी दिल्लीः शाओमीने नुकतीच आपला रेडमी नोट ८ या स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ केली होती. परंतु, कंपनीने आता रेडमी नोट ८ प्रो (Redmi Note 8 Pro) च्या किंमतीत कपात केली आहे. रेडमीचा हा स्मार्टफोन आता १ हजार रुपयांच्या कपातीसह खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. कंपनीने १ हजार रुपयांची कपात केली असली तरी ही कपात ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असलेल्या मध्ये करण्यात आली आहे. कंपनीची अधिकृत वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली आहे. Pro चा ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनवर १ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन आता १३ हजार ९९९ रुपयांना खरेदी करता येऊ शकतो. याआधी या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये इतकी होती. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी आणि ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये व १७ हजार ९९९ रुपये आहे. या दोन्ही फोनमध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. या फोनमध्ये अँड्रॉयड ९ पाय आधारित MIUI 10 मिळणार आहे. तसेच ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला असून त्याचा रिझॉल्यूशन १०८०x२३४० पिक्सल आहे. या फोनमध्ये मीडियाटेकचा हीलियो G90T प्रोसेसर आहे. गेमर्स साठी हे बनवण्यात आले आहे. या फोनमध्ये ८ जीबी रॅम मिळणार असून कुलिंगसाठी लिक्विड कुलिंग सपोर्ट मिळणार आहे. रेडमी नोट ८ प्रो हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे. ज्यात ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये चार रियर कॅमेरे देण्यात आले आहे. ६४ मेगापिक्सलचा, ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल आणि अन्य दोन २-२ मेगापिक्सलचे कॅमेरे यात देण्यात आले आहे. खास सेल्फीसाठी २० मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फास्ट चार्जिंगसाठी १८ वॅट चे फास्ट चार्जर देण्यात आले आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2T0duxr
Comments
Post a Comment