Netflix चा झटका; फ्री सब्सक्रिप्शन बंद

नवी दिल्लीः इंडियाने भारतीय युजर्संना जोरदार दणका दिला आहे. आता पर्यंत फ्री मध्ये मिळणारी पहिल्या महिन्याची नेटफ्लिक्सची सेवा बंद करण्यात येणार आहे. यासाठी आता युजर्संना पैसे मोजावे लागणार आहेत. पहिल्या महिन्यात मिळणारे बंद करण्यात येणार असून युजर्संना पहिल्या महिन्यापासून आता पैसे मोजावे लागतील. नेटफ्लिक्स या ऑफरचा प्रचार व प्रसार आपल्या अॅपवरून करीत आहे. नेटफ्लिक्सची ही ऑफर केवळ नवीन ग्राहकांसाठी आहे. म्हणजेच जर तुम्ही पहिल्यांदा नेटफ्लिक्सचा वापर करणारे असाल तर तुम्हाला केवळ ५ रुपये पहिल्या महिन्याचे मोजावे लागतील. त्यानंतर १९९ रुपयांपासून ७९९ रुपयांपर्यंत प्लानची निवड करू शकता. याआधी पहिल्या महिन्याचे सब्सक्रिप्शन फ्रीमध्ये मिळत होते. नेटफ्लिक्सच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ही एक प्रमोशनल ऑफर आहे. ५ रुपयांत एक महिन्याची सेवा मिळणार आहे. म्हणजेच एकप्रकारे ही एक ट्रायल ऑफर आहे. सध्या काही युजर्संनाच ही मिळत आहे. गेल्या वर्षी नेटफ्लिक्सने मोबाइल युजर्संसाठी मासिक प्लान लाँच केला होता. याची किंमत १९९ रुपये आहे. या किंमतीत ग्राहकांना एसडी क्वॉलिटी मिळेल. तसेच एकाच स्क्रीनवर याचा वापर करता येऊ शकणार आहे. म्हणजेच १९९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना एकाच फोनवर नेटफ्लिक्सचा वापर करता येऊ शकतो. कंपनीने या प्लानचे नाव गो-मोबाइल ठेवले आहे. या प्लानचा वापर स्मार्टफोन आणि टॅबलेट वर केला जाऊ शकतो. या प्लान अंतर्गत स्क्रीन करून टीव्हीवर व्हिडिओ पाहू शकत नाहीत.


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2T55z1B

Comments

clue frame