सॅमसंग Galaxy S20 सीरिजची प्री बुकिंग सुरू

नवी दिल्लीः सॅमसंगने आपली फ्लॅगशीप लाँच केली आहे. या सीरिज अंतर्गत Galaxy S20, Galaxy S20+ आणि Ultra हे तीन फोन लाँच केले आहेत. या फोनमध्ये १०८ मेगापिक्सल पर्यंत प्रायमरी कॅमेरा आणि ४० मेगापिक्सलपर्यंत सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या तिन्ही स्मार्टफोनमध्ये ५जी सपोर्ट आणि १२०Hzचे रिफ्रेश रेट देण्यात आले आहेत. या फोनची प्री बुकिंग सुरू करण्यात आली आहे. Galaxy S20 ची किंमत व वैशिष्ट्ये फोनमध्ये ६.२ इंचाचा क्वॉड एचडी प्लस डायनॅमिक AMOLED 2x डिस्प्ले देण्यात आला आहे. फुल एचडी रिझॉल्युशनचा हा फोन 120Hz चा रिफ्रेश रेटसोबत येतो. फोनचा डिस्प्ले HDR10+ सर्टिफाइड आहे. ८ जीबी आणि १२ जीबी रॅमचा पर्यायसह १२८ जीबी इंटरनल स्टोरेजसोबत लाँच करण्यात आला आहे. फोनची मेमरी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. फोटोग्राफीसाठी एस२० मध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, १२ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स आणि १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देण्यात आला आहे. कॅमेरा 30x के डिजिटल झूम आणि 3x चे हायब्रिड ऑप्टिकल झूम आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी १० मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. २५ वॅटची फास्ट चार्जिंगसह 4000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची किंमत भारतात ६६ हजार ९९९ रुपये आहे. Galaxy S20+ ची किंमत व वैशिष्ट्ये या फोनमध्ये ६.७ इंचाचा क्वॉड एचडी प्लस डायमॅनिक AMOLED 2x डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. या फोनचा डिस्प्ले HDR10+ सर्टिफाइड आहे. फोनला ८ जीबी प्लस १२८ जीबी आणि १२ जीबी प्लस ५१२ जीबी रॅम स्टोरेजमध्ये लाँच केले आहे. गरज पडल्यास मेमरी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने १ टीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये रियरमध्ये चार कॅमेरे देण्यात आले आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. १२ मेगापिक्सलचे दोन कॅमेऱ्यासह एक डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी १० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी दिली आहे. फास्ट चार्जिंगसाठी २५ वॅटला सपोर्ट करते. या फोनची किंमत भारतात ७३ हजार ९९९ रुपये असणार आहे. Galaxy S20 Ultra ची किंमत व वैशिष्ट्ये गॅलेक्सी एस२० सीरिजमधील हा फोन सर्वात प्रीमियम असा फोन आहे. या फोनमध्ये 100x डिजिटल झूमसह १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये ६.९ इंचाचा क्वॉड एचडी प्लस डायनॅमिक AMOLED 2x डिस्प्ले देण्यात आला आहे. बाकीच्या दोन्ही फोनप्रमाणे या फोनमध्येही 120Hz चे रिफ्रेश रेट आणि HDR10+ सर्टिफिक्शन देण्यात आला आहे. फोन दोन पर्यायात म्हणजेच १२ जीबी आणि १६ जीबीत आहेत. हे तीन स्टोरेजमध्ये येतात. १२८ जीबी, २५६ जीबी आणि ५१२ जीबी मध्ये पर्याय उपलब्ध आहे. मेमरी कार्डच्या मदतीने मेमरी १ टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. हा फोन सर्वात महागडा फोन असणार आहे. या फोनची किंमत ९२ हजार ९९९ रुपये असणार आहे. या फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर (वाइड अँगल) सह ४८ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी ४० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे फोन चार्जिंगसाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. फास्ट चार्जिंगसाठी ४५ वॅट सपोर्ट देण्यात आला आहे. या ऑफर्स मिळणार सॅमसंगने या सीरिज अंतर्गत फोन बुक करणाऱ्या ग्राहकांसाठी काही ऑफर्स दिल्या आहेत. प्री बुक करणाऱ्या ग्राहकांना Galaxy Buds+ ट्रू वायरलेस ईयरबड्स २ हजार ९९९ रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तसेच सॅमसंग केअरचे सब्सक्रिप्शन १ हजार ९९९ रुपयांत मिळणार आहे. Galaxy S20+ आणि प्री बुक करणाऱ्या ग्राहकांना गॅलेक्सी बड्स प्लस ट्रू वायरलेस ईयरबड्स आणि सॅमसंग केअर प्लस सब्सक्रिप्शन १ हजार ९९९ रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38ASfIS

Comments

clue frame