सॅमसंग Galaxy A71 आज लाँच होणार

नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी ए सीरिजचा नवा स्मार्टफोन भारतात आज लाँच करणार आहे. आज १९ फेब्रुवारी रोजी स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. या आधी कंपनीने लाँच केला होता. कंपनीने Galaxy A71 हा स्मार्टफोन नुकताच व्हिएतनाममध्ये लाँच केला होता. भारतात या स्मार्टफोनची किंमत ३० हजार रुपये असू शकते. सॅमसंग गॅलेक्सी ए७१ ची सुरुवातीची किंमत २९ हजार ९९९ रुपयांपेक्षा कमी असू शकते. कंपनीने गेल्यावर्षी लाँच केलेल्या गॅलेक्सी ए७० चा आधुनिक फोन म्हणून या फोनकडे पाहिले जाते. या नव्या फोनमध्ये अनेक नवीन अपग्रेड्स फीचर्स आणि खास वैशिष्ट्ये असणार आहेत. Galaxy A71 ची खास वैशिष्ट्ये या फोनमध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले असणार आहे. १०८०x२४०० रिझॉल्युशन पिक्सल असणार आहे. ६ जीबी रॅम आणि ८ जीबी रॅम तसेच १२८ जीबी इंटरनल स्टोरेजचा पर्यायासह पॉवरफुल ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ७३० एसओसी प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सह १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि ५ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. गॅलेक्सी ए७१ मध्ये २५ वॅटची फास्ट चार्जिंगसह ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ub3PeZ

Comments

clue frame