कनेक्टिंग इंडियाः BSNLची जिओ कंपनीवर मात

नवी दिल्लीः गेल्यावर्षीच्या डिसेंबर महिन्यात प्रीपेड प्लानमध्ये टॅरिफचे दर वाढवल्यानंतर याचा सरळ फायदा अर्थात सरकारी कंपनी ला झाल्याचे दिसत आहे. कंपनीने डिसेंबर २०१९ मध्ये देशभरात सर्वात जास्त नवीन युजर्स जोडले आहेत. बीएसएनएलच्या तुलनेत इतर टेलिकॉम कंपन्या मागे आहेत. पहिल्या क्रमांकावर BSNL आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर रिलायन्स जिओचा नंबर आहे. बीएसएनएलने गेल्या डिसेंबर महिन्यात ४.२ लाख नवीन युजर्स जोडले आहेत. तर याच महिन्यात रिलायन्स जिओने केवळ ८२ हजार ३०८ नवीन युजर्स जोडले आहेत. BSNL व जिओच्या तुलनेत नेहमीप्रमाणे व्होडाफोन-आयडिया कडे युजर्संनी पाठ फिरवली आहे. भारती एअरटेल आणि एमटीएनएलने युजर्स गमावले आहेत. रिलायन्स जिओची २०१६ मध्ये टेलिकॉम क्षेत्रात पदार्पण झाले आहे. त्यानंतर प्रत्येक महिन्यात जिओने पाच मिलियन हून अधिक युजर्स जोडण्याचे काम केले आहे. परंतु, डिसेंबर महिन्यात टॅरिफचे दर वाढवल्यानंतर पहिल्यांदा जिओचे युजर्स जोडण्याला प्रतिसाद कमी मिळाला. डिसेंबर महिन्यात जिओला केवळ ८२ हजार ३०८ नवीन युजर्स जोडणे शक्य झाले आहे. बीएसएनएलने डिसेंबरमध्ये सर्वात जास्त म्हणजे ४२७०८९ नवीन युजर्स जोडले आहे. BSNL ने पहिल्यांदा जिओला मागे टाकले आहे. बीएसएनएलचे मार्केट शेअर १०.२६ टक्के आहे. डिसेंबर महिन्यात टेलिकॉम खासगी कंपन्यांनी आपल्या प्रीपेड टॅरिफच्या दरात ४० टक्के दरवाढ केली आहे. परंतु, बीएसएनएलने आपल्या काही निवडक सर्कलमध्ये वैधता कमी करीत बाकी काही बदल केला नाही. त्यामुळे BSNL ला नवीन युजर्स जोडता आले. बीएसएनएल व जिओ यांनी युजर्स जोडण्याचे काम केलेले असताना व्होडाफोन-आयडियाकडे मात्र नेहमीप्रमाणे युजर्संनी पाठ फिरवली आहे. डिसेंबर मध्ये ३.६ मिलियन युजर्संनी या कंपन्यांची सेवा सोडली. तर दुसरीकडे एअरटेलने डिसेंबरमध्ये ११ हजार ग्राहक सोडून गेले.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2w86TZK

Comments

clue frame