व्होडाफोनचे स्वस्तातील दोन रिचार्ज प्लान बंद

नवी दिल्लीः व्होडाफोनने ९९७ रुपये आणि ४९ रुपयांचे दोन प्रीपेड आपल्या वेबसाइटवरून हटवले आहे. यात ९९७ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज पॅक उत्तर प्रदेश सर्करमध्ये उपलब्ध होता. तर ४९ रुपयांचा ऑल राउंडर पॅक केवळ मुंबईतून हटवला आहे. ९९७ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह डेटाचे बेनिफिट मिळत होते. तर ४९ रुपयांच्या रिचार्ज पॅक ऑल राउंडर प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, मोफत डेटा आणि एसएमएस सह ३८ रुपयांचा टॉक टाइम दिला जात होता. व्होडाफोनने ९९७ रुपयांचा प्लान केवळ उत्तर प्रदेश वेस्ट सर्कल मध्ये लाँच करण्यात आला होता. विशेष म्हणजे, हा प्लान गेल्या महिन्यात लाँच करण्यात आला होता. लाँच करून महिना होत नाही तोच आता कंपनीने तो बंद केला आहे. या प्लानमध्ये युजर्संना दरदिवस १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड लोकल व नॅशनल कॉल, दरदिवस १०० फ्री एसएमएस मिळत होते. या प्लानची वैधता १८० दिवस म्हणजेच सहा महिने इतकी होती. या प्लानमध्ये युजर्संवा ४९९ रुपयांचा एक वर्षाचा प्ले चे सब्सक्रिप्शन आणि ९९९ रुपये किंमतीचे Zee5 सब्सक्रिप्शन फ्री मिळत होते. व्होडाफोनच्या ४९ रुपयांच्या ऑल राउंडर पॅक खूप सर्कलमध्ये उपलब्ध आहे. परंतु, कंपनीने हा प्लान केवळ मुंबईतून हटवला आहे. या पॅकमध्ये युजर्संना ३८ रुपयांचा टॉकटाइम मिळत होता. तसेच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळत होती. या प्लानची वैधता २८ दिवसांची होती. युजर्संना या प्लानमध्ये १०० एमबी डेटाही दिला जात होता. हा प्लान हटवल्यानंतर व्होडाफोनने मुंबई पेजवर केवळ ३९ रुपये आणि ७९ रुपयांचा ऑल राउंडर प्रीपेड रिचार्ज पॅक उपलब्ध ठेवले आहे. या प्लानची वैधता १४ दिवस व २८ दिवस इतकी आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2HPgZl1

Comments

clue frame