एअरटेल ग्राहकांना झटका; 'या' प्लानमध्ये दरवाढ

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी () ने ग्राहकांना चांगलाच झटका दिला आहे. सम-विषम पोस्टपेड प्लानच्या किंमतीत वाढ केली आहे. एअरटेलच्या १९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लानसाठी आता ग्राहकांना २४९ रुपये मोजावे लागणार आहेत. या प्लान अंतर्गत युजर्संना पहिल्यासारखी सेवा मिळणार आहे. याआधी एअरटेलने पोस्टपेड प्लानमध्ये मिळणारी नेटफ्लिक्सची मोफत सेवा बंद केली होती. एअरटेलच्या या प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड व्हाईस कॉल, १०० एसएमएसची सुविधा मिळणार आहे. तसेच युजर्संना १० जीबी डेटा देणार आहे. या प्लान अंतर्गत ग्राहकांना १८ टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. कंपनीने फॅमिली पोस्टपेड प्लान सीरिजला २०१७ मध्ये लाँच केले होते. ४९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लानमध्ये ७५ जीबी डेटा आणि एसएमएस सुविधा मिळणार आहे. युजर्संना कोणत्याही अन्य नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकणार आहे. तसेच कंपनी ग्राहकांना अॅमेझॉन प्राइम, एअरटेल एक्सट्रिम आणि मोबाइल प्रोटेक्शन स्कीनचे सब्सक्रिप्शन देणार आहे. एअरटेलचा ७४९ रुपयांचा पोस्टपेड प्लानमध्ये ग्राहकांना २०० जीबी रोल ओव्हरची सुविधा मिळणार आहे. १२५ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधा मिळणार आहे. कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकणार आहे. तसेच या प्लानमध्ये अॅमेझॉन प्राइम, एअरटेल एक्सट्रिम आणि मोबाइल प्रोटेक्शन स्कीनचे सब्सक्रिप्शन देणार आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Sy3oo9

Comments

clue frame