नवी दिल्लीः रिलायन्स लागोपाठ आपले प्लान अपडेट करीत आहे. गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये टॅरिफ प्लान महाग केल्यानंतर कंपनीने २०२० रूपयांची हॅप्पी न्यू ऑफर बंद केली आहे. त्या जागी आता कंपनीने २१२१ रुपयांचा प्री पेड प्लान लाँच केला आहे. कंपनीने जिओ फोन ग्राहकांसाठी आता आणखी दोन नवे प्लान लाँच केले आहेत. ४९ रुपये आणि ६९ रुपयांचे हे दोन प्लान आहेत. कंपनीने जिओ फोनसोबत ४९ रुपयांचा प्लान लाँच केला होता. जिओ फोनच्या ४९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता मिळत होती. परंतु, कंपनीने डिसेंबर मध्ये नवीन टॅरिफ सह हा प्लान बंद केला होता. आता पुन्हा हा प्लान लाँच केला आहे. परंतु, कंपनीने या प्लानची वैधता कमी केली आहे. जिओ फोनच्या ४९ रुपयांच्या प्लानमध्ये आता केवळ १४ दिवसांची वैधता मिळणार आहे. या प्लानमध्ये एकूण २ जीबी डेटा मिळणार आहे. जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, जिओवरून अन्य दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी २५० मिनिट कॉलिंग आणि २५ मेसेज करण्याची सुविधा मिळणार आहे. जिओच्या ६९ रुपयांच्या या प्लानमध्ये १४ दिवसांची वैधता आहे. परंतु, यात डेटा अर्धा दिला जात आहे. जिओ फोनच्या ६९ रुपयांच्या प्लानमध्ये एकूण ७ जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजेच, दररोज ५०० एमबी डेटा मिळणार आहे. जिओ ते जिओ फ्री कॉलिंग, अन्य नेटवर्कवर २५० मिनिटची कॉलिंग मिळणार आहे. जिओच्या मासिक प्लानची चर्चा केल्यास जिओचा ७५ रुपयांचा प्लान आहे. ज्यात २८ दिवसांची वैधता मिळते. या प्लानमध्ये एकूण ३ जीबी डेटा, जिओ ते जिओ कॉलिंग अनलिमिटेड आणि जिओ ते अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी ५०० मिनिट्स दिले जाते. यात एकूण ५० मेसेज फ्री आणि सर्व अॅप्सचे सब्सक्रिप्शन दिले जाते.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39YhK7f
Comments
Post a Comment