नोकियाचा स्मार्टफोन स्वस्त, नवी किंमत बजेटमध्ये!

नवी दिल्लीः नोकियाचा जबरदस्त स्मार्टफोन असलेला हा फोन १ हजार रूपयांनी स्वस्त करण्यात आला आहे. एचएमडी ग्लोबलने गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये या फोनला लाँच केले होते. कंपनीने या फोनला भारतात ८ हजार १९९ रुपयांत लाँच केले होते. परंतु, आता या फोनमध्ये १ हजारांची कपात करण्यात आल्याने या फोनची किंमत केवळ ७ हजार १९९ रुपये इतकी झाली आहे. या फोनला केवळ एकाच प्रकारात कंपनीने लाँच केले होते. नोकियाच्या या फोनमध्ये ६.२ इंचाचा एचडी डिस्प्ले, २ जीबी रॅम, ड्युअल रियर कॅमेरा यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत. सेल्फी कॅमेऱ्यासाठी या फोनमध्ये नॉच डिझाइन दिला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक हेलियो ए२२ प्रोसेसर आणि अँड्ऱॉयड ९ पाय ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. यात ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि रियरमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी, २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सरचा ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. चार्जिंगसाठी ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. नोकियाच्या फीचर्स फोनचा विक्रीचा विक्रम नोकियाचे मोबाइल बनवणाऱ्या एचडीएम ग्लोबलने वर्ष २०१९ मध्ये १.२९ कोटी स्माार्टफोन बनवले होते. कंपनीने गेल्यावर्षी ५.३५ कोटी फीचर्स फोनची विक्री केली आहे. नोकियाने गेल्यावर्षी स्मार्टफोनच्या तुलनेत ४ पट अधिक फीचर्स फोनची विक्री केली आहे. २०१८ मध्ये स्मार्टफोनची शीपमेंट २७ टक्के कमी झाली. कंपनीने २०१८ मध्ये १.७८ कोटी स्मार्टफोनची शीपमेंट केली होती.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Stdffb

Comments

clue frame