प्रत्येक गोष्ट आपल्याला मोबाईल फोनमध्ये हवी असते. अशा वेळी आपल्या टीव्हीचा किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा रिमोट कंट्रोलही मोबाईलमध्ये मिळाला तर? घरात रिमोट पटकन सापडेल काय, याची चिंता नाही, की रिमोट सांभाळण्याची काळजी नाही. विविध अँड्रॉइड रिमोट ॲपच्या साह्याने टीव्हीचा तसेच विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा रिमोट कंट्रोल मोबाईलमध्ये घेता येतो. अशा रिमोट कंट्रोल ॲपच्या मदतीने आपले काम सोपे होते. शुअर युनिव्हर्सल स्मार्ट टीव्ही रिमोट ॲप, एनीमोट, ट्विनवन युनिव्हर्सल टीव्ही रिमोट, युनिफाइड रिमोट ॲप अशी ॲप्स त्यासाठी उपलब्ध आहेत.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
शुअर युनिव्हर्सल स्मार्ट टीव्ही रिमोट ॲप : हे एक चांगले ॲप आहे. याचा उपयोग अँड्रॉइड मोबाईलमध्ये तसेच स्मार्ट फोनमध्येही करता येतो. इलेक्ट्रॉनिक साधनांसाठीही स्मार्ट रिमोट कंट्रोल आपण वापरू शकतो. टीव्ही, सेटटॉप बॉक्स, एअर कंडिशनर, डीएसएलआर कॅमेरा, डीव्हीडी प्लेअर, प्रोजेक्टर, पॉवर कंट्रोल अशा उपकरणांसाठी या रिमोट कंट्रोलचा वापर करता येतो. डिश टीव्ही, एलजी टीव्ही, सॅमसंग टीव्ही, सोनी टीव्ही, यासाठी या रिमोटचा वापर करता येतो. या ॲपच्या साह्याने टीव्हीवरील चॅनेलची यादी वर-खाली करण्याबरोबरच चॅनेल बदलता येतात.
एनीमोट (AnyMote) : चांगल्या टीव्ही रिमोट ॲपपैकी हे ॲप आहे. हे ॲप सध्या जगभरातील सुमारे नऊ लाख लोक वापरत आहेत. हे ॲप फक्त टीव्हीसाठीच उपयुक्त नसून, या ॲपचा उपयोग डीएसएलआर कॅमेरा, एअर कंडिशनर आणि आयआर ब्लास्टर असलेल्या कोणत्याही तंत्रज्ञानासाठी करता येऊ शकतो. टीव्हीवर ‘नेटफ्लिक्स’चे सबस्क्रिप्शन असेल, तर अशा गोष्टींसाठीही हे ॲप उपयुक्त आहे.
‘ॲप’निंग : लाभले अम्हांस भाग्य टंकतो मराठी
ट्विनवन युनिव्हर्सल टीव्ही रिमोट : अँड्रॉइड टीव्हीसाठी रिमोट म्हणून अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेट आपण वापरू शकतो. ट्विनवन युनिव्हर्सल टीव्ही रिमोट हे ॲप डाऊनलोड करून ते सहजशक्य आहे. आपल्या अँड्रॉइड टीव्हीवर गेम खेळण्यासाठी डी-पॅड आणि टचपॅड मोडही या ॲपमध्ये उपलब्ध आहेत. ज्यामुळे गेम खेळणेही सोपे होते किंवा त्यासाठी दुसरा रिमोट वापरण्याची गरज नाही. टीव्हीशी हा रिमोट ‘वाय-फाय’ किंवा ‘ब्लू टूथ’च्या साह्याने जोडता येतो. हे ॲप सर्व अँड्रॉइड टीव्हींसाठी वापरता येते. ते ‘गुगल प्ले’वर उपलब्ध आहे.
युनिफाइड रिमोट : हे एक वेगळेच रिमोट ॲप आहे. एखाद्या संगणकावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे उपयुक्त आहे. ज्यांच्याकडे एचटीपीसी (होम थिएटर पीसी) सेटअप आहेत, त्यांच्यासाठी हे ॲप फायदेशीर आहे. हे ॲप पीसी, मॅक आणि लिनक्ससाठी उपयुक्त आहे. या ॲपद्वारे माऊस आणि की-बोर्डही वापरता येतो. हे ॲप हे रास्पबेरी पाई डिव्हाइसेस, अर्डिनो युन डिव्हाइसेस अशा बऱ्याच गोष्टींसाठी उपयुक्त आहे. या ॲपमध्ये अनेक फीचर असून, ती अत्यंत फायदेशीर ठरतात. हे ॲप अँड्रॉइड फोनवर ‘गुगल प्ले स्टोअर’वरून डाऊनलोड करता येईल.
स्मार्टकास्ट मोबाईल ॲप : बऱ्याच टीव्ही निर्मात्यांकडे स्मार्ट टीव्हीसाठी रिमोट ॲप्स असतात. या ॲप्समध्ये सर्व प्रकारच्या क्षमता असतात. ते स्मार्ट टीव्हीवर ‘वायफाय’वर कनेक्ट करतात. म्हणजेच, हे काम करण्यासाठी आयआर ब्लास्टरची आवश्यकता या ॲपमुळे भासत नाही. या ॲपच्या साह्याने टीव्हीचे चॅनेल बदलता येतात किंवा आवाज कमी-जास्त करता येतो.
from News Story Feeds https://ift.tt/3ab2vYT
Comments
Post a Comment