नवी दिल्लीः स्मार्ट स्पीकरकडून करण्यावरून जगभरात वाद-विवाद सुरू असताना फेसबुकने आपला प्रोनाउंसिएशन्स (Pronunciations) प्रोग्राम लाँच केला आहे. या प्रोग्राम अंतर्गत युजर्संना व्हाईस रेकॉर्डिंगसाठी फेसबुक पैसे देणार आहे. या प्रोग्रामच्या मदतीने फेसबुक आपली स्पीच रिकॉग्निशन टेक्नोलॉजी आणखी चांगली करण्याचा प्रयत्न करणार आहे. फेसबुकचा हा प्रोग्राम त्यांच्या व्ह्यू पॉइंट मार्केट रिसर्च अॅपवर उपलब्ध आहे. या प्रोग्रामसाठी एक चाचणी द्यावी लागणार आहे. जर या चाचणीत तुम्ही उत्तीर्ण झालात तर या प्रोग्राममध्ये तुमचा समावेश केला जाईल. या प्रोग्राम अंतर्गत आधीच तुम्हाला या पोर्टल सोबत फेसबुकच्या फ्रेंड लिस्टमध्ये आपल्या एखाद्या मित्राचे नाव बोलून दाखवून रेकॉर्ड करावे लागेल. त्यानंतर या प्रक्रिये अंतर्गत आणखी १० मित्रांचे नाव बोलून दाखवावे लागणार आहे. रेकॉर्डिंगचा एक सेट पूर्ण झाल्यानंतर फेसबुक तुम्हाला २०० पॉइंट देईन. त्यानंतर PayPal च्या माध्यमातून ५ डॉलर म्हणजेच ३६० रुपये मिळेल. जर १ हजारांपेक्षा कमी पॉइंट झाल्यास तुम्हाला फेसबुक रिडिम करणार नाही. या रेकॉर्डिंग संदर्भात बोलताना फेसबुकने सांगितले की, व्हाईस रेकॉर्डिंगला प्रोफाइलला कनेक्ट करण्यात येणार नाही. फेसबुकचा हा प्रोग्राम सध्या अमेरिकेत आहे. भारतात कधी होईल, यासंबंधी फेसबुकने अद्याप काहीही माहिती दिली नाही. या प्रोग्राममध्ये १८ वर्षाहून अधिक वय असलेले तरूण युजर्स सहभागी होऊ शकतात.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37LbL4d
Comments
Post a Comment