श्रीमंत वॉरेन बफे आता 'हा' स्मार्टफोन वापरतात

नवी दिल्लीः जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानी असलेले उद्योगपती वॉरेन बफे हे अत्यंत साध्या पद्धतीने राहतात. त्यांची साध्या राहणीची नेहमी चर्चा होत असते. आज पुन्हा एकदा त्यांची चर्चा सुरू झाली आहे. बफे ही खूप वर्षापासून अवघ्या दीड हजारांचा फीचर फोन वापरत होते. परंतु, आता त्यांनी नुकताच एक स्मार्टफोन वापरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. वॉरेन बफे हे आतापर्यंत दीड हजार रुपये किंमत असलेला सॅमसंगचा फ्लिप फोन वापरत होते. या फोनची किंमत केवळ दीड हजार रुपये आहे. बफे हे जो फोन वापरत आहेत. तो फीचर फोन सॅमसंगने २००९ ला लाँच केला होता. त्यावेळी त्या फोनचे मॉडेल Samsung SCH-U320 होते. परंतु, वॉरेन बफे यांनी आता आयफोन ११ वापरायला सुरुवात केली आहे. याची माहिती त्यांनी स्वतः एका मुलाखतीत दिली आहे. आयफोन ११ हा स्मार्टफोन मी सध्या वापरत आहे. पण, तो मी खरेदी केला नाही. तर मला तो फोन भेट म्हणून मिळाला आहे. या फोनचा वापर मी केवळ गेम खेळण्यासाठी तसेच सोशल मीडियासाठी करीत असल्याचेही बफे यांनी सांगितले. बफे यांची संपत्ती ६.३१ लाख कोटी ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, वॉरेन बफे यांच्याकडे ८,७६० कोटी डॉलर म्हणजेच जवळपास ६.३१ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. बफे यांची कंपनी बर्कशायर हेथवेने नुकतीच डिसेंबरमध्ये २०१९ मधील तिमाहीत आकडेवारी प्रसिद्ध केले आहेत. यात त्यांच्या कंपनीला मोठा २९.२ अब्ज डॉलरचा फायदा झाल्याची माहिती दिली आहे. त्यांची कंपनी ही अमेरिकेतील सर्वात जास्त मार्केट व्हॅल्यू असलेल्या कंपनीपैकी एक आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2uEsn0c

Comments

clue frame