जपानने करोनाग्रस्तांना वाटले २ हजार आयफोन

नवी दिल्लीः जपान सरकार डायमंड प्रिन्सेस क्रूजवर फसलेल्या करोना व्हायरस ग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली आहे. संक्रमित प्रवाशांना मदत व्हावी यासाठी जपान सरकारने २ हजार वाटले आहे. वाटण्यात आलेल्या आयफोनमध्ये सोशल मीडिया अॅप लाइनला इन्स्टॉल करून दिले आहे. या अॅपवरून लोक मेसेजिंगवरून डॉक्टरसोबत चर्चा करू शकतील. करोनापासून कसं वाचायचं, यासंदर्भात ते डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतील, यासाठी जपान सरकारने हे पाऊल उचललं आहे. मॅकोटकारच्या एका रिपोर्टनुसार, आरोग्य मंत्रालय आणि दूरसंचार मंत्रालयांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांना तसेच चालक दलांना २ हजार आयफोन वाटले आहे. आयफोनमध्ये आधीच लाइन अॅप इन्स्टॉल करण्यात आला आहे. या अॅपच्या मदतीने जपानमधील अडकलेले प्रवाशी आरोग्य विभागांशी चर्चा करू शकतील. जहाजमधील चालक व प्रवाशांच्या प्रत्येक केबिनमध्ये कमीत कमी एक आयफोन देण्यात आला आहे. जपानबाहेर रजिस्टर्ड गुगल प्ले स्टोर आणि अॅप स्टोरमध्ये लाइन अप डाउनलोड करण्याचा पर्याय नाही. तसेच क्रूजवरील अनेक सदस्यांनी सांगितले होते की, आयफोन मध्ये लाइन अपचा सहज वापर करता येऊ शकतो. तर अँड्रॉयडचा वापर करता येत नाही. डायमंड प्रिन्सेस क्रूज शीपमध्ये जवळपास ३ हजार ७०० प्रवासी अडकले आहेत. यात ६ जण भारतीय प्रवासी आहेत. जहाजावर ११०० क्रू मेंबर आहेत. ज्यात १३२ जण भारतीय आहेत. यातील ३५० जणांना करोनाची लागण झाली आहे. या क्रूजमध्ये भारताची सोनाली ठक्कर अडकली आहे. ठक्कर हिला करोना व्हायरसची लागण झाली नाही. तिला पुन्हा भारतात आणण्यासाठी तिच्या वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती केली आहे.


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37wjP92

Comments

clue frame