औरंगाबादः एकदा लागलं की कशाचीच तमा बाळगली जात नाही. त्याला फक्त पबजीचा टास्क पूर्ण करायचा असतो. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. हिमाचल प्रदेशातील एक अल्पवयीन मुलगा पबजीचा टास्क पूर्ण करण्यात इतका गुंग झाला की, तो हिमाचल प्रदेशातून कधी महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यात पोहोचला हे त्याला समजले नाही. पोलिसांच्या मदतीने या अल्पवयीन मुलाला पुन्हा हिमाचल प्रदेशला पाठवण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशच्या सोलन जिल्ह्यातील कुनिहार भागातील एक अल्पवयीन मुलगा अचानक घरातून गायब झाला. कुटुंबीयांनी कुनिहार पोलिस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. पोलिसांनी तपास सुरू केला असता किशोरच्या मोबाइलचे लोकेशन महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये सापडले. यानंतर पोलिस बाल युनिटने किशोरला थांबवून त्याला सुरक्षित ठेवले. १७ फेब्रुवारी रोजी कुनिहार भागातील एका व्यक्तीने आपला अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाल्याची नोंद केली. पोलिस त्या युवकाच्या मोबाइलचे लोकेशन सतत तपासत होते. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेम खेळत असताना तरूण आपले टास्क पूर्ण करण्यासाठी घराबाहेर पडला. आपल्या घरापासून काही किलोमीटर अंतरावर तो महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील मनमाडला पोहोचला हेही त्याला माहित नव्हते. अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. शिवकुमार शर्मा यांनी सोलन येथील घटनेची माहिती देताना सांगितले की, १७ फेब्रुवारी रोजी अल्पवयीन मुलाच्या बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलिसात दाखल करण्यात आली होती. किशोर महाराष्ट्रातील मनमाड येथे असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तिथल्या पोलिसांशी संपर्क साधून किशोरला थांबून ठेवले. त्यानंतर त्याच्या पालकांशी संपर्क साधून किशोरला त्यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3c1iKcw
Comments
Post a Comment