रियलमी ६ सीरीज स्मार्टफोन ५ मार्चला लाँच होणार

नवी दिल्लीः X50 प्रो लाँच नंतर कंपनीने आता ६ सीरिज स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी सुरू केली आहे. कंपनीची ही बजेटमधील स्मार्टफोन सीरिज असणार आहे. यात ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा असणार आहे. नुकतीच रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी ट्विटरवर अभिनेता सलमान खानसोबत एक फोटो शेअर केला होता. यात रियलमी ६ चा वॉटरमार्क दिसत होता. रियलमी ६ सीरीज स्मार्टफोन ५ मार्चला लाँच करणार आहे. या सीरिजमध्ये रियलमी ६ आणि ६ प्रो स्मार्टफोन लाँच करणार आहे. रियलमीने आतापर्यंत भारतीय बाजारात प्रो सीरिजचे एकूण ९० लाख स्मार्टफोनची विक्री केली आहे. रियलमीने याआधी रियलमी X2 लाँच केला होता. यात रॅम आणि स्टोरेजचे तीन व्हर्जन लाँच केले होते. या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपयांपासून १९ हजार ९९९ रुपयांपर्यंत आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा आहे. प्रायमरी सेन्सर म्हणून ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. X2 शिवाय रियलमीने X2 प्रो भारतीय बाजारात उपलब्ध केला आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, १३ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स, ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. फोनची किंमत २७ हजार ९९९ रुपये आहे. तर दुसऱ्या फोनची किंमत ३५ हजार रुपये आहे. शाओमीचा रेडमी नोट ८ प्रो स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहे. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर, २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32AYpXa

Comments

clue frame