इंटरनेट स्पीडमध्ये जिओ फायबर 'नंबर वन'

नवी दिल्लीः ब्रॉडबँड इंटरनेट स्पीडमध्ये रिलायन्स जिओ () फायबरने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. नेटफ्लिक्सच्या स्पीड इंडेक्समध्ये रिलायन्स जिओ फायबरने ३.६३ Mbpsच्या वेगाने अव्वल स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे, गेल्यावर्षी लाँचिंग करण्यात आल्यानंतर रिलायन्स जिओ फायबरची स्पीड कमी झाली होती. परंतु, यावेळी जिओने एअरटेल आणि स्पेक्ट्रा यासारख्या कंपन्यांना मागे टाकले आहे. अमेरिकेच्या व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लेटफॉर्म नेटफ्लिक्सवर दर महिन्याला इंटरनेट सर्विस प्रोव्हाईडर्सची स्पीड आकडेवारी जारी केले जातात. ताज्या रिपोर्टनुसार, जानेवारी २०२० ची ही आकडेवारी आहे. गेल्या महिन्यात मुंबईची ७ स्टार डिजिटल पहिल्या स्थानावर होती. यावेळी रिलायन्स जिओ फायबरने बाजी मारली आहे. जिओनंतर ७ स्टार डिजिटल, स्पेक्ट्रा, एअरटेल, यू ब्रॉडबँड आणि अॅक्ट फायबरनेट यासारख्या कंपन्यांचे स्थान राहिले आहे. रिलायन्स जिओने 100 Mbps चा दावा केला होता. परंतु, नेटफ्लिक्सच्या रिपोर्टमध्ये ३.६३ Mbps ची स्पीड नोंदली गेली आहे. स्पीड चेक करण्यासाठी नेटफ्लिक्सने आपला कॉन्टेंटला प्ले करून चाचणी केली. दुसऱ्या स्थानवर असलेल्या ७ स्टार डिजिटलची स्पीड ३.६० Mbps होती. तर स्पेक्ट्राची स्पीड ३.५० Mbps, एअरटेल ब्रॉडबँडची स्पीड ३.४८ Mbps आणि यू ब्रॉडबँडची स्पीड ३.४१ Mbps आहे. रिलायन्स जिओ प्लानची किंमत ६९९ रुपयापासून सुरू होते. हा १०० Mbps, २५० Mbps, आणि १ Gbps वेगवेगळे प्लान ऑफर करते.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39vWkhF

Comments

clue frame