'हे' आहेत जगातील Best Selling Smartphones

नवी दिल्ली : सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात दररोज नवंनवे फोन्स मार्केटमध्ये येत आहेत. एक-दीड हजार रुपयापासून ते अगदी काही लाख रुपयांपर्यंत स्मार्टफोन उपलब्ध आहेत. आता आपण जगभरातील काही टॉप स्मार्टफोनची माहिती घेणार आहोत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Apple iPhone XR : Apple चा iPhone XR या स्मार्टफोन ग्राहकांच्या पसंतीस चांगलाच उतरला आहे. 2019 मध्ये 46.3 मिलियन स्मार्टफोनची विक्री झाली आहे. या स्मार्टफोनची किंमत 49,900 रुपये आहे. 

Apple iPhone XR

Apple iPhone 11 : iPhone 11 नंतर दुसऱ्या क्रमांकावर हा फोन येतो. 2019 मध्ये 37.3 मिलियन फोन्सची विक्री झाली. सप्टेंबरमध्ये हा फोन लाँच झाला. हा फोन 64900 रुपयांना उपलब्ध आहे.

apple iphone 11

Samsung Galaxy A10 : Galaxy A10 हा सॅमसंगचा एँट्री-लेव्हल स्मार्टफोन आहे. हा जगातील तिसरा सर्वाधिक विक्रीला जाणारा स्मार्टफोन आहे. सॅमसंगने 30 मिलियन ग्राहकांनी हा स्मार्टफोन घेतला आहे. या स्मार्टफोनची किंमत 7,990 रुपये आहे.

Samsung Galaxy A10 :

Samsung Galaxy A50 : Galaxy A50 हा चौथा असा सर्वाधिक विकला जाणारा फोन आहे. हा स्मार्टफोन 12,999 रुपयांना उपलब्ध आहे. हा एक बजेट फोन असून, आतापर्यंत जवळपास  24.2 मिलियन स्मार्टफोन विकण्यात आले.

Samsung Galaxy A50 :

Samsung Galaxy A20 : स्मार्टफोन ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. आत्तापर्यंत 19.2 मिलियन स्मार्टफोनची विक्री करण्यात आली आहे. या स्मार्टफोनच किंमत 10,990 आहे.  

Samsung Galaxy A20 :



from News Story Feeds https://ift.tt/32xTJ4o

Comments

clue frame