'जिओ'चे बेस्ट प्रीपेड प्लान; 168GB पर्यंत डेटा

नवी दिल्लीः रिलायन्स जिओला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. जिओ युजर्संना दैनंदिन डेटाचे प्लान्स ऑफर करीत आहे. डिसेंबर २०१९ रोजी कंपनीने आपल्या प्रीपेड प्लानच्या किंमतीत वाढ केली आहे. परंतु, जिओचे काही प्रीपेड प्लान ग्राहकांना चांगले डेटा देत आहेत. २ जीबी डेटा प्रमाणे युजर्संना एकूण १६८ जीबी पर्यंत डेटा मिळत आहे. जिओचा २४९ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानमध्ये युजर्संना दररोज २ जीबी डेटा, १०० फ्री एसएमएस मिळतो. २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये जिओ नेटवर्क्ससाठी अनिलिमिटेड कॉलिंग मिळते. तर अन्य नेटवर्क्सला कॉल करण्यासाठी १००० मिनिट मिळते. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. रिलायन्स जिओचा ४४४ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानमध्ये एकूण ११२ जीबी (दररोज २ जीबी डेटा) डेटा मिळतो. ५६ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये जिओ ते जिओ अनिलिमिटेड कॉलिंग मिळते. दररोज १०० एसएमएस सह अन्य नेटवर्क्सवर कॉलिंग करण्यासाठी २००० मिनिट्स दिले जातात. जिओचा ५९९ रुपयांचा प्लान या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. दररोज २ जीबी डेटा याप्रमाणे एकूण १६८ जीबी डेटा ग्राहकांना मिळतो. प्लानमध्ये दररोज १०० फ्री एसएमएस सह जिओ नंबर्ससाठी अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तर अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी ३००० मिनिट्स दिले जातात. या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2SXI7Dr

Comments

clue frame