सॅमसंग गॅलेक्सी Z फ्लिप फोल्डेबल फोनची किंमत 'ही' आहे...

नवी दिल्ली: गॅलेक्सी एस२० सीरिजचा स्मार्टफोन पुढच्या महिन्यात लाँच होणार आहे. सॅमसंगच्या या फ्लॅगशीप सीरिजची यूजर्सना अनेक दिवसांपासन प्रतीक्षा आहे. याच दरम्यान या फोनचा डेटा लीक झाल्याने युजर्सची उत्सुकता आणखी वाढली आहे. पॉप्युल टिप्स्टर मॅक्स विनबाकने दावा केलाय की गॅलेक्सी S20, S20+ आणि S20 अल्ट्राचा सेल ६ मार्चपासून सुरू होईल. गॅलेक्सी S20 अल्ट्राची किंमत 1300 डॉलर्स म्हणजे सुमारे ९२,४०० रुपयांच्या आसपास असू शकेल. गॅलेक्सी Z फ्लिपची किंमत एक लाख रुपयांपेक्षा कमी असेल, अशी शक्यताही मॅक्सने वर्तवली आहे. गॅलेक्सी Z फ्लिप हा कंपनीचा पुढील फोल्डेबल फोन आहे. हा फोन १४ फेब्रुवारीला लाँच होण्याची शक्यता आहे. सॅमसंग गॅलेक्सी Z फ्लिपची किंमत १४०० डॉलर्स म्हणजेच सुमारे ९९,५०० रुपये असू शकेल. क्लॅमशेल डिझाइन गॅलेक्सी Z फ्लिप सॅमसंगचा पुढील फोल्डेबल फोन आहे आणि हा Moto Razr प्रमाणे क्लॅमशेल स्टाइल फोल्डेबल डिझाइनसह येणार आहे. कदाचित कंपनी या फोनला ग्लास डिस्प्ले देण्याची शक्यता आहे. याआधी आलेल्या गॅलेक्सी फोल्ड, मोटे रेजर आणि हुवावे मेट X या अन्य फोल्डेबल फोनचे डिस्प्ले प्लास्टिकचे होते. सॅमसंग गॅलेक्सी २० सीरिजचा हा फोन वॉटर रेजिस्टंट आहे. दरम्यान, सॅमसंगचा अत्याधुनिक गॅलेक्सी एस १० लाइट ( ) ची प्री बुकिंग ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत साईटवर सुरू करण्यात आली आहे. या फोनला काही दिवसापूर्वीच लाँच करण्यात आले होते. या फोनवर प्री बुकिंग केल्यास ग्राहकांना ३ हजार रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. तसेच ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआय यासारखा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या फोनचा पहिला सेल ४ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2GsnmKb

Comments

clue frame