सॅमसंग गॅलेक्सी S10 Lite ची प्री बुकिंग सुरू

नवी दिल्लीः सॅमसंगचा अत्याधुनिक गॅलेक्सी एस १० लाइट () ची प्री बुकिंग ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत साईटवर सुरू करण्यात आली आहे. या फोनला काही दिवसापूर्वीच लाँच करण्यात आले होते. या फोनवर प्री बुकिंग केल्यास ग्राहकांना ३ हजार रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. तसेच ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआय यासारखा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या फोनचा पहिला सेल ४ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. या फोनच्या खास वैशिष्ट्यांवर नजर टाकल्यास या फोनमध्ये अँड्रॉयड १० आधारावर यूआय २.० मिळणार आहे. तसेच फोनमध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळणार आहे. याचा रिझॉल्यूशन १०८०X२४०० पिक्सल आहे. फोनमध्ये सुपर अमोलेड प्लस डिस्प्ले आहे. गॅलेक्सी एस १० लाइट मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळणार आहे. या फोनमध्ये ट्रिपल कॅमेऱ्याचा सेटअप देण्यात आला आहे. यात पहिला ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. दुसरा १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगलचा आणि तिसरा ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आहे. सेल्फीसाठी यात ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेऱ्यासह सुपर स्टडी ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेश मिळणार आहे. यामुळे फोटो आणि व्हिडिओ दोन्हीही सोबत काम करू शकतील. या फोनमध्ये ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनला सुपर फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. बॅटरी दोन दिवसापर्यंत बॅकअप देते, असा कंपनीचा दावा आहे. फोनचे वजन १८६ ग्रॅम आहे. फोनमध्ये डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. या फोनची किंमत भारतात ३९ हजार ९९९ रुपये इतकी आहे. या फोनमध्ये ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेज मिळणार आहे. ६ जीबी रॅमच्या फोनची किंमत अद्याप कंपनीकडून सांगण्यात आली नाही.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2RQ9JtK

Comments

clue frame