नवी दिल्ली: चीनमधील ही स्मार्टफोन कंपनी आज भारतात हा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. आकर्षक डिझाइन असलेल्या या स्मार्टफोनचं आज दुपारी १२ वाजता लॉन्चिंग होणार आहे. स्टाइलिश आणि स्लिक बॉडी तसेच चार रिअल कॅमेरा असलेल्या या स्मार्टफोनची कमीत कमी किंमत २० हजार रुपये असेल त्यामुळे ग्राहकांसाठी हा फोन म्हणजे नवीन पर्वणीच ठरणार आहे. कंपनीने या फोनची फिचर्स उघड केली नसली तरी या फोनच्या फोटोवरून हा स्मार्टफोन त्याच्यातील फिचर्सवरून आकर्षक ठरणार असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. ओप्पोचे फोन हे सेल्फीच्या दृष्टीने तयार करण्यात येत असल्याने या मोबाइलमध्ये चार रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये VOOC फ्लॅशचार्ज ३.० टेक्नॉलॉजीचा सपोर्टही देण्यात आला आहे. मागच्या एका अहवालानुसार VOOC फ्लॅश चार्ज ३.०च्या मदतीने ५ मिनिट स्मार्टफोन चार्ज केल्यावर २ तासांचा टॉकटाइम मिळतो. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आल्याने यूजर्सला त्यांचा फोटोग्राफीचा छंदही जोपासता येणार आहे. या फोनमधील फिचर इन डिस्प्ले फिंगरप्रिंट ३.० द्वारे डिव्हाइस केवळ ०.३२ सेकंदातच अनलॉक करता येणार आहे. या फोनची उंची ७.९ मीटर असून वजन १७२ ग्राम एवढे आहे. ८ जीबी रॅम हे या फोनचं वैशिष्ट्ये आहे. या मोबाइलला मेटॅलिक फ्रेम देण्यात आली आहे. या फ्रेमजवळच पॉवर बटनही देण्यात आलं असून ते सुद्धा मेटॅलिकचं असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या फोनमध्ये व्हर्टिकल पोझिशनमध्ये कॅमेरे दिल्या जाऊ शकतात, असं सांगितलं जातं. एफ सीरिजचं वैशिष्ट्ये सेल्फी कॅमेरा हे एफ सीरिजच्या मोबाइलचं खास वैशिष्ट्ये आहे. त्यामुळेच या नव्या सीरिजमध्ये कॅमेऱ्यावर सर्वाधिक भर देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच चीनमध्ये Reno 3 आणि Reno 3 Pro हे दोन स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले होते. ८ जीबी रॅम असलेल्या Reno 3ची किंमत ३४ हजार ७०० रुपये आहे. त्याच्या १२ जीबी रॅमच्या फोनची किंमत ३७ हजार ७०० रुपये एवढी आहे. तर ८ जीबी रॅम असलेल्या Reno 3 Proची किंमत ४० हजार ८०० रुपये असून १२ जीबी रॅमच्या मोबाइलची किंमत ४५ हजार ९०० रुपये आहे. हे दोन्ही फोन ड्युल मोडचे असून त्यांना ५जी सपोर्ट देण्यात आला आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2FTYkn9
Comments
Post a Comment