कमाल! बिना वायर चार्ज होणार OnePlus 8 Pro

मुंबई: स्मार्टफोन कंपन्या आजकाल नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. यापैकीच एक आहे वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी. हुवावे, शाओमी आणि ओप्पोनंतर आता वनप्लस देखील आपला प्लॅगशिप स्मार्टफोन मध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्ट देणार आहे. अलीकडेच ट्विटरवर एका पोस्टमध्ये याचा फोटो शेअर करण्यात आला आहे. यात असं म्हटलंय की वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीसर येण्यास तयार आहे. जो फोटो शेअर केला आहे त्यात एका वायरलेस चार्जिंग पॅडवर फोन दिसत आहे. 'charge like a pro' असं टेक्स्ट या पोस्टसोबत लिहिलंय. हा फोटो खऱ्या वनप्लस ९ प्रो चा नाही. वनप्लस या चार्जिंग टेक्नॉलॉजीवर गेली काही वर्षे काम करत आहे. असं म्हटलं जात आहे की कंपनी यासाठी आता तयार आहे. वन प्लस ८ प्रो ची वैशिष्ट्ये वनप्लस ८ प्रो किन स्पेसिफिकेशन्ससह येणार आहे. लीक रिपोर्ट्सनुसार, OnePlus 8 Pro ६.६५ इंचाच्या फ्लुइड डिस्प्लेसह येणार आहे. CAD रेंडर्स नुसार हा फोन पंच होल आणि कर्व्ह्ड AMOLED डिस्प्लेसह येईल. सेल्फी कॅमेरासाठी दिलेला पंच होल डिस्प्ले वर डावीकडे असेल. फोनचा डिस्प्ले क्वॉड एचडी + आणि १२० Hz रिफ्रेश रेटचा असेल. OnePlus 8 Pro चा डिस्प्ले रिफ्रेश रेट आपल्या गरजेनुसार आपण 60Hz, 90Hz किंवा 120Hz वर सेट करू शकणार आहोत. फोनमध्ये १२ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज असू शकेल. स्नैपड्रैगन 865 चिपसेट चा प्रोसेसर असेल. फोटोग्राफीसाठी वनप्लस ८ प्रो मध्ये ६४ मेगापिक्सल प्रायमरी सेंसरसह क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. फोनमध्ये कदाचित ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल. फोनमध्ये वॉर्प चार्ज टेक्नॉलॉजी असणार 4500mAh ची बॅटरी असू शकेल.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2NPicfl

Comments

clue frame