फ्लिपकार्टवर २४ इंच LED टीव्ही ५ हजारांत

नवी दिल्लीः फ्लिपकार्टवर सेल सुरू करण्यात येणार असून या सेलमध्ये २४ इंचाचा एलईडी टीव्ही केवळ ४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करण्याची ग्राहकांना संधी आहे. थॉमसनकडून फ्लिपकार्टवर या सेलचे आयोजन करण्यात आले आहे. फ्लिपकार्टवर रिपब्लिक डे सेल ची सुरुवात १९ जानेवारी पासून सुरू होणार आहे. फ्लिपकार्ट प्लस सदस्यांना म्हणजेच १८ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता ही टीव्ही खरेदी करता येऊ शकणार आहे. थॉमसनकडून फ्लिपकार्टवरील सेलमध्ये २४ इंचाचा एलईडी टीव्ही सर्वात कमी किंमतीत मिळणार आहे. या सेलमध्ये ७ हजार ४९९ रुपयांचा टीव्ही केवळ ४ हजार ९९९ रुपयात मिळणार आहे. कंपनीच्या २४ इंचाच्या टीव्हीत २० व्हॉल्टेज स्पीकर आऊटपूट मिळणार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ६० एचझेड रिफ्रेश रेटसह सॅमसंगच्या पॅनलचा वापर करण्यात येणार आहे. टीव्ही माय वॉल इंटरफेसवर चालणारा आहे. यात एका वर्षाची वॉरंटी सुद्धा ग्राहकांना मिळणार आहे. तसेच या सेलमध्ये थॉमसनच्या इतर उत्पादनावरही डिस्काउंट दिला जाणार आहे. ग्राहकांना ३२ इंचाचा एचडी टीव्ही ७ हजार ९९९ रुपया ऐवजी ६ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येऊ शकणार आहे. तसेच कंपनीच्या यूडी९ सीरिजच्या चार मॉडेलवर डिस्काउंट ग्राहकांना दिला जाणार आहे. ग्राहकांना ४३ इंचाचा ४ के यूएचडी टीव्ही फक्त २० हजार ९९९ रुपयांत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. मोठी स्क्रीनची टीव्ही तुम्हाला खरेदी करायची असेल तर थॉमसनची ५० इंचाची टीव्ही केवळ १९ हजार ४९९ रुपयात खरेदी करता येऊ शकते. यात तब्बल ३० टक्के सूट देण्यात आली आहे. फ्लिपकार्टच्या अपकमिंग सेलमध्ये थॉमसनचा ६५ इंचाच्या अँड्रॉयड टीव्हीवरही मोठा डिस्काउंट दिला जाणार आहे. ग्राहकांना ५१ हजार ९९९ रुपयात हा टीव्ही खरेदी करता येऊ शकतो. भारतात हा टीव्ही ७९ हजार ९९९ रुपयांना लाँच करण्यात आला होता. या टीव्हीवर तब्बल ३३ टक्के सूट देण्यात आली आहे.



from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2NCpwes

Comments

clue frame