शाओमी K20 प्रो फोनवर ३ हजारांचा डिस्काउंट

नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी () ने रेडमी के२० प्रो () वर तब्बल ३ हजारांचा डिस्काउंट दिला आहे. कंपनीने हा फोन जुलै महिन्यात लाँच केला होता. शाओमीचा हा स्मार्टफोन सर्वात पॉवरफुल समजला जातो. रेडमी के२० प्रो हा फोन खरेदी करण्याची ग्राहकांना चांगली संधी आहे. शाओमी इंडियाचे हेड मनू कुमार जैन यांनी ट्विटरवर फोनची किंमत कमी करण्यात आल्याची माहिती दिली. कंपनीने या फोनच्या किंमतीत कपात करण्यात आल्यानंतर या फोनची किंमत आता २४ हजार ९९९ रुपये झाली आहे. हा फोन फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी केला जावू शकतो. शाओमीच्या हा फोन मर्यादीत कालावधीसाठी उपलब्ध आहे. रेडमीचा ६ जीबी रॅम असलेल्या फोनवर ३ हजार डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. या आधी या फोनची किंमत २७ हजार ९९९ रुपये होती. या फोनमध्ये ६.३८ इंचाचा फुल एचडी AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये सोनी IMX586 सेंसरचा ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, १३ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा टर्शिअरी सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये २० मेगापिक्सलचा पॉप अप सेल्फीचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये २७ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४,००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ReRAqo

Comments

clue frame