नवी दिल्लीः ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट () वर सुरू असलेल्या () मध्ये स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. आयफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मस्त सुट दिली जात आहे. अॅपलचा या फोनवर तब्बल ३९ हजार ९०१ रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. ६ जीबी असलेल्या या स्मार्टफोनची किंमत ८९ हजार ९०० रुपये इतकी आहे. परंतु, याववर तब्बल ४० हजारांची सूट देण्यात येत असल्याने हा फोन ४९ हजार ९९९ रुपयांना खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच फोनमध्ये एक्सचेंज ऑफरचा पर्याय असल्याने हा फोन खरेदी करताना १४ हजार ५० रुपयापर्यंत फायदा मिळू शकतो. या फोनमध्ये ५.८ इंचाचा रेटिना OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ६४ जीबी इंटरनल स्टोरेजसह असलेला हा फोन ए१२ बायॉनिक प्रोसेसरवर काम करतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. तर सेल्फीसाठी फोनमध्ये ७ मेगापिक्सलचा ट्रू डेप्थ कॅमेरा दिला आहे. आयफोन एक्सएस मध्ये खास एचडीआर सपोर्ट देण्यात आला आहे. खासगी आणि सुरक्षेसाठी यात फेस आयडी फीचर देण्यात आले आहे. फोनला पॉवर देण्यासाठी २६५८ एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. आयफोन एक्सएस वायरलेस चार्जिंग देण्यात आला आहे. हे क्यूआय सर्टिफाइड चार्जेसला सपोर्ट करते. फोनमध्ये आयपी ६८ रेटिंग मिळाली आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TFuhaO
Comments
Post a Comment