रेडमी नोट ८ प्रो की ओप्पो F15 कोणता फोन बेस्ट?

नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी ओप्पो (Oppo)ने नुकताच आपला ओप्पो एफ१५ () फोन भारतात लाँच केला होता. भारतात या फोनची सरळ टक्कर या फोनसोबत होणार आहे. रेडमी नोट ८ प्रोची किंमत ओप्पो एफ१५ पेक्षा कमी आहे. जर या दोन फोनपैकी तुम्हाला कोणता फोन घ्यायचाय याविषयी काही संशय असेल तर या दोन्ही फोनची खास वैशिष्ट्ये पाहायला हवीत. रेडमी नोट ८ प्रो ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये आणि ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १७ हजार ९९९ रुपये इतकी आहे. तर ओप्पो एफ१५ या फोनची किंमत १९ हजार ९९० रुयपे इतकी आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज दिला आहे. ओप्पो एफ१५ स्मार्टफोनमध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी अमोलेड स्क्रीन दिला आहे. रेडमी नोट ८ प्रोमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी एचडीआर डिस्प्ले दिला आहे. ओप्पोचा लेटेस्ट स्मार्टफोन एफ१५ मध्ये मीडिया टेक हेलिओ पी७० प्रोसेसरवर चालतो. तर ओप्पोचा फोन अँड्रॉयड ९ पाय व्ही९.० वर बेस्ड् करल ओएस ६.१ वर चालतो. रेडमी नोट ८ प्रोत ड्युअल सीम (नॅनो) सपोर्ट आहे. ओप्पोच्या फोनमध्ये रियरमध्ये क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. म्हणजेच फोनच्या मागे ४ कॅमेरे दिले आहेत. मुख्य कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा आहे. बॅकमध्ये ८ मेगापिक्सलचा आणि २ मेगापिक्सलचा दोन कॅमेरे दिले आहेत. ओप्पोमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. रेडमी नोटमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासोबत ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. रेडमी नोट ८ प्रो मध्ये सेल्फीसाठी २० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. ओप्पोची बॅटरी क्षमता ४,००० एमएएचची दिली आहे. तर रेडमी फोनमध्ये ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37EX0AA

Comments

clue frame