नवी दिल्ली : रियलमी ५ प्रो फक्त २८९९ रुपयांत ऑर्डर केला जाऊ शकतो. या फोनची मूळ किंमत १३ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते. या फोनचं रिफर्बिश्ड मॉडल खरेदी करण्यासाठी या वेबसाईटवर जावं लागेल. मर्यादित ग्राहकांसाठी फर्स्ट कम फर्स्ट सर्व या आधारावर ही ऑफर आहे. स्टॉक शिल्लक असेपर्यंतच ही ऑफर चालू राहणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. रियलमीने गेल्या आठवड्यातच रियलमी ५ प्रो हा फोन लाँच केला आहे. क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप असलेल्या या फोनला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अत्यंत दमदार फीचर्स असूनही कंपनीने हा फोन भारतीय बाजारात मध्यम किंमतीत आणला आहे. रियलमीच्या ऑनलाईन सेलमध्ये फोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. काही ग्राहकांनी फोन खरेदी केला, तर काहींच्या पदरी निराशा पडली. पण मर्यादित आधारावर अत्यंत कमी दरात हा फोन खरेदी करण्याची ऑफर कंपनीने दिली आहे. रिफर्बिश्ड मॉडल म्हणजे असे फोन जे काही कारणास्तव पुन्हा विक्रेत्याकडे आले आहेत. या फोनची तपासणी करुन ते आता कमी किंमतीत विकले जात आहेत. स्टॉक मर्यादित असल्यामुळे मागणी जास्त आहे, शिवाय ग्राहकांना मॉडल आणि कलर ऑप्शन मिळत नाहीत. काय आहे रिफर्बिश्ड मॉडल ? रिफर्बिश्ड म्हणजे अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू, ज्या विविध कारणांमुळे पुन्हा विक्रेत्यांकडे येतात. या वस्तूंची पुन्हा चाचणी केली जाते आणि याचं नवीन प्रोडक्ट तयार केलं जातं. या वस्तूमधील प्रत्येक समस्या दूर करुन फोन पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध होतो. यालाच रिफर्बिशिंग म्हटलं जातं. ग्राहकांसाठी दोन ऑफर्स रिफर्बिश्ड रियलमी ५ प्रो स्टॉक संपल्यानंतर FreeKamal तुम्हाला दोन ऑफर्स मिळत आहेत. पहिली ऑफर म्हणजे रिफर्बिश्ड रियलमी ५ प्रोच्या जागी तुम्ही दुसरा फीचर फोनही घेऊ शकता. अन्यथा २८९९ रुपयांचा वापर एखाद्या दुसऱ्या व्यवहारासाठीही करू शकता, ज्यासाठी तुम्हाला एक कूपन कोड दिला जाईल. रियलमी ५ प्रोचे फीचर्स रियलमी ५ प्रोमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिझाईनसह ६.३ इंच आकाराचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळेल. रिअर पॅनल फिंगरप्रिंट सेन्सर, ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७१२ ऑक्टा कोअर प्रोसेसर, ४८ मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सेल वाइड अँगल सेन्सर आणि २ मेगापिक्सेल पोर्ट्रेट लेन्सचा कॅमेरा सेटअप आणि ५०००mAh क्षमतेची बॅटरी असे दमदार फीचर्स यामध्ये आहेत. फोन कसा ऑर्डर कराल ? या फोनचा स्टॉक अत्यंत मर्यादित आहे. फर्स्ट कम, फर्स्ट सर्व या आधारावर फोनची विक्री केली जात आहे. त्यामुळे संबंधित जाऊन लवकरात लवकर फोन ऑर्डर करावा लागेल.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2RmLCT9
Comments
Post a Comment