नवी दिल्लीः टेक्नॉलॉजी कंपनी () ने नुकतेच भारतात आपले पाच नवीन उत्पादन लाँच केले आहेत. यात ऑनर ९ एक्स, ऑनर वॉच मॅजिक २, बँड ५ आय, आणि दोन ब्लूटूथ इअरफोनचा समावेश आहे. आता कंपनीने भारतात आपले उत्पादन आणखी उतरवण्याची तयार केली आहे. ऑनर लवकरच लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे. याची लाँचिंग या महिन्याच्या महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. कंपनी भारतात ऑनर आणणार आहे. सुरुवातीला याची ऑलाइन विक्री करण्यात येणार आहे. ऑनर ९एक्स च्या लाँचिंगदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीतल ऑनर इंडियाचे अध्यक्ष चार्ल्स पेंग यांनी ही माहिती दिली. आम्ही पहिल्या तिंमाहिच्या अखेरपर्यंत किंवा दुसऱ्या तिमाहिच्या सुरुवातीला भारतात लॅपटॉप घेऊन येत आहोत. भारतीय ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी हा लॅपटॉप आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये कंपनीने चीनमध्ये आपला पहिला स्मार्ट टीव्ही ऑनर व्हिजन लाँच केला होता. या टीव्हीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात पॉप अप कॅमेरा देण्यात आला आहे. ही टीव्ही आता भारतात लाँच करण्यात येणार आहे. ऑनर टीव्ही व्हिजन कंपनीचे कस्मट ऑपरेटिंग सिस्टम सह बाजारात येणारा हा हिला टीव्ही असणार आहे. या स्मार्ट टीव्हीसोबतच कंपनी ऑनर मॅजिक बुक लॅपटॉप सह उतरवण्यात येणार आहे. चार्ल्स पेंग यांनी यासंबंधी माहिती देताना सांगितले की, कंपनी हॉटस्टार आणि नेटफ्लिक्स या सारख्या कंटेट पार्टनर्स सह काम करणार आहे. भारतात चांगले काम करता यावे यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36TB6cM
Comments
Post a Comment