नवी दिल्लीः रिलायन्स जिओच्या नेटवर्कवरून दुसऱ्या कोणत्याही नेटवर्कवर संपर्क करण्यासाठी ग्राहकांकडून जिओने शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारचे घेणारी ही पहिलीच कंपनी आहे. जिओच्या अनलिमिटेड प्लान्समध्ये मिनिटे संपुष्टात आणल्यामुळे ग्राहकांना अन्य नेटवर्कवर संपर्क साधण्यासाठी ६ पैसे प्रति मिनिट शुल्क द्यावे लागते. या ६ पैसे शुल्काची भरपाई म्हणून जिओने ग्राहकांसाठी खास ऑफर आणली असून, नव्या ऑफर अंतर्गत ग्राहकांना १०० जीबीपर्यंत डेटा मोफत दिला जाणार आहे. ग्राहकांना ही सुविधा व्हाऊचरवर दिली जात आहे. रिलायन्स जिओकडून ग्राहकांना ६ वेगवेगळी टॉप-अप व्हाऊचर उपलब्ध करण्यात आली आहेत. यामध्ये १० रुपये, २०, ५०, १००, ५०० आणि १००० रुपयांचे टॉप-अप व्हाऊचर ग्राहकांना मिळतील. या टॉप-अप व्हाऊचरने रिचार्ज केल्यावर युजर्सना अनुक्रमे ७.४७ रुपये, १४.९५, ३९.३७, ८१.७५, ४२०.७३ आणि ८४४.४६ रुपयांचे टॉक-टाइम मिळेल. या व्हाऊचरसोबत कंपनी मोफत डेटा देणार आहे. रिलायन्स जिओवरून अन्य नेटवर्कवर संपर्क केल्यामुळे ग्राहकांना लागणाऱ्या ६ पैसे प्रति मिनिट आययूसीची भरपाई म्हणून प्रति १० रुपये खर्च केल्यानंतर कंपनीकडून १ जीबी कॉम्प्लिमेंट्री डेटा मिळेल. याप्रमाणे २० रुपयांचे रिचार्ज केल्यावर २ जीबी डेटा, ५० रुपयांच्या रिचार्जवर ५ जीबी डेटा, १०० रुपयांवर १० जीबी डेटा, ५०० रुपयांवर ५० जीबी डेटा आणि १ हजार रुपयांच्या रिचार्जवर १०० जीबी डेटा मोफत मिळू शकेल.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36qezmL
Comments
Post a Comment