अॅमेझॉनच्या जेफ बेझॉसचा फोन हॅक!

मुंबई: तंत्रज्ञानामुळे गोष्टी खूप सोप्या झाल्या असल्या तरी दुसरीकडे यूजर्सच्या व्यक्तिगत माहिती आणि गोपनीयतेच्या सुरक्षेवर गदा आली आहे. जगातली सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे मालक देखील यातून सुटू शकलेले नाहीत. जेफ यांचा मोबाईल एक व्हॉट्स अॅप मेसेज रिसीव्ह केल्यामुळे हॅक झाला आहे. असं म्हटलं जात आहे की जेफ यांना जो मेसेज पाठवण्यात आला होता तो सौदी अरेबियाचे प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांचा होता. काही तासातच जेफ यांच्या मोबाइलचा खूप जास्त डेटा चोरी झाल्याचाही दावा केला जात आहे. द गार्डियनच्या वृत्तानुसार, जेफ आणि सौदी प्रिंस यांच्यातील संभाषणादरम्यान एक व्हिडिओ सेंट केला गेला होता. हा व्हिडिओ म्हणजे एक मॅलिशिअस फाइल होती, जी जेफ यांच्या फोनमध्ये शिरण्यासाठी डिझाइन केली होती. यापूर्वी अमेरिकेतील एक गॉपिस मॅगझिन द नॅशनल इन्क्वायरर वर देखील जेफ यांची वैयक्तिक माहिती चोरल्याचा आरोप आहे. यात द वॉशिंग्टन पोस्टचे स्तंभलेखक जमाल खशोगी यांच्या हत्येशी संबंधित माहितीदेखील लीक केली गेली होती. द वॉशिंग्टन पोस्टचे मालिकही जेफ बेझॉस आहेत. जेफ यांच्या वैयक्तिक आयुष्यावर नजर ठेवण्याचा याआधीही प्रयत्न केला गेला आहे. the National Enquirer ने जेफ आणि त्यांची गर्लफ्रेंड (फॉक्स न्यूजची माजी अँकर लॉरेन सांचेज) यांच्यातील संभाषणही प्रकाशित केले होते. यानंतर २०१९ मध्ये जेफ यांनी या टॅबलॉइडच्या प्रकाशकावर ब्लॅकमेलिंग आणि खंडणीचे आरोप केले होते. सौदी अरेबियाने दिला नकार दरम्यान, जेफ यांना American Media Inc (the National Enquirer ची पॅरेंट कंपनी) आणि सौदी अरेबिया यांच्यातल्या संबंधांचा अंदाज आला. त्यांच्या मते वॉशिंग्टन पोस्टमध्ये खशोगी खूनप्रकरणाच्या केलेल्या कव्हरेजवर सौदीचे प्रिंस खूश नव्हते. दुसरीकडे सौदीचे परराष्ट्र मंत्री आदिल अल जुबेर यांच्या मते या संपूर्ण प्रकरणात सौदी अरेबियाचा कुठला संबंध नाही. शिवाय the National Enquirer ने देखील जेफ यांच्या आरोपांचं खंडन केलं आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2RjhR6M

Comments

clue frame