मोठ्या स्क्रीनचा स्वस्त फोन; इअरफोनही फ्री!

नवी दिल्ली: ग्लोबल प्रिमिअम स्मार्टफोन ब्रँड टेक्नोने भारतीय बाजारात आपला यावर्षीचा पहिला स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत ६,२९९ रुपये आहे. या बजेट स्मार्टफोनसोबत टेक्नो ५-७ हजार रुपयांच्या सेगमेंटमध्ये ६.५२ इंचाचा HD+ स्क्रीन उपलब्ध करणारी ही पहिली कंपनी ठरली आहे. स्मार्टफोनमध्ये डॉट नॉच डिस्प्ले दिला आहे आणि याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशिओ ८९.५ टक्के आहे. कंपनीचा दावा आहे की स्मार्टफोनची मोठी स्क्रीन यूजर्सना सिनेमे पाहण्याचा आणि गेमिंगचा चांगला अनुभव देते. फ्री मिळत आहेत ७९९ रुपयांचे ब्लू टूथ इअरफोन Spark Go Plus खरेदी केल्यावर कॉम्प्लिमेंटरी म्हणून ग्राहकांना ७९९ रुपयांचे ब्लूटूथ इअरफोन मोफत दिले जाणार आहेत. ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. याव्यतिरिक्त वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट आणि एका महिन्याची एक्स्टेंडेड वॉरंटी देखील मिळणार आहे. सोबतच स्पेशल ऑफर म्हणून गाना प्लसचं तीन महिन्यांचं सबस्क्रीप्शन मोफत मिळणार आहे. टेक्नोचा हा स्मार्टफोन हिलियर पर्पल आणि व्हेकेशन ब्लू रंगात मिळेल. हा स्मार्टफोन ९ जानेवारीपासून ३५,००० रिटेल टचपॉइंटवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. फोन मध्ये ४,००० mAh ची दमदार बॅटरी टेक्नोच्या Spark Go Plus मध्ये ४,००० mAh ची हाय-डेन्सिटी लार्ज कपॅसिटी बॅटरी देण्यात आली आहे. फुल चार्ज केल्यास ती दिवसभर चालते. Spark Go Plus मध्ये तुम्ही सहा तास व्हिडिओ पाहू शकता, ११० तास म्युझिकचा आनंत लुटू शकता आणि ६.९ तास गेम खेळू शकता. याव्यतिरिक्त २६ तास कॉल करू शकता. स्टॅंडबाय टाइम ३४३ तासांचा आहे. फोनच्या बॅटरीत AI पॉवर सेविंग, फुल चार्ज अलर्ट आणि फोन फुल चार्ज झाल्यावर ऑटोमॅटिक पॉवर कट सारखे फिचर्स आहेत.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35DetaM

Comments

clue frame