खास अंदाजात द्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

मुंबई: भारताचा ७१ वा आपण उत्साहात साजरा करणार आहोत. याच दिवशी भारतानं संविधानाचा स्वीकार केला आणि जगातील सगळ्यात मोठा लोकशाही असलेला देश म्हणून भारत नावारुपाला आला.देशात लोकशाहीचे नवे पर्व सुरू झाले म्हणून हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून ओळखला जातो. म्हणूनच हा दिवस देशातील प्रत्येक नागरिकासाठी खास आहे. या दिवसाचा आनंद इतरांना शुभेच्छा दिल्या शिवाय कसा द्विगुणीत होईल? चला तर मग या दिवशी आपल्या मित्रपरिवाराला मेसेज करुन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊयात... देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा, देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा, उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यांनी भारत देश घडविला… भारत देशाला मानाचा मुजरा! माझी मायभूमी, तुला प्रणाम... तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना. भारत मात की जय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा वाचा: स्वप्न सगळेच बघतात स्वत:साठी इतरांसाठी आपण आज एक स्वप्न बघूया देशासाठी आपल्या सर्वांसाठी सुरक्षित भारत सुविकसित भारत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा खरा प्रजासत्ताक तेव्हाच साजरा होईल जेव्हा संविधान कागदावर न राहता त्यातील प्रत्येक अधिकार सामान्य माणसाला बजावता येईल. आपण सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत, तरी सारे भारतीय एक आहेत , प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TTBGTZ

Comments

clue frame