नवी दिल्लीः इन्स्टंट मॅसेजिंगसाठी सर्वाधिक प्रमाणावर वापरले जाणारे सध्या डाऊन आहे. जगभरातील युजर्सना याचा फटका बसत आहे. सायंकाळी ४ वाजल्यापासून व्हॉट्सअॅप डाऊन असल्याची माहिती मिळाली आहे. आयओएस आणि अँड्रोइड अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरील युजर्सना व्हॉट्सअॅप वापरण्यास अडचणी येत आहेत. फोटोज, जीआयएफ, स्टीकर्स, व्हिडिओ पाठवण्यात अडचणी येत आहेत. त्याचप्रमाणे व्हॉट्सअॅपवर आलेले फोटो, व्हिडिओ, स्टीकर्स, अन्य फाइल्स डाऊनलोड करण्यासही अडचणी येत आहेत. काही युजर्सना टेक्स्ट मेसेजेस पाठवण्यातही अडचणी येत असल्याचे समजते. फेसबुकची मालकी असलेले व्हॉट्सअॅप भारतातील काही भाग, ब्राझीलमधील काही भाग, मध्य आशियातील काही भाग, युरोपमधील काही भाग आणि संयुक्त अरब आमिरातीच्या काही भागात डाऊन आहे, अशी माहिती 'डाऊनडिटेक्टर डॉट इन' या संकेतस्थळाकडून देण्यात आली. व्हॉट्सअॅप डाऊन झाल्यावर युजर्सनी ट्विटरवर यासंदर्भातील ट्रेड सुरू केला आहे. तर अनेकांनी या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली. तर काही जणांनी यावर मिम्स बनवून ट्विटरवर शेअर केले आहेत.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ucGDwA
Comments
Post a Comment