जिओ ग्राहकांची संख्या पोहोचली ३७ कोटींवर

नवी दिल्लीः इंडस्ट्रीज लिमिटेड ने तिसऱ्या तिमाहीचे अपडेट् जाहीर केले आहेत. कंपनीने २०१९-२० च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये कन्सोलिडेटिड ११, ६४० कोटी रुपयांचा नफा झाला आहे. हा नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत १३.५ टक्के अधिक आहे. या तिमाहीत जिओचा बंपर फायदा झाला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने माहिती दिली आहे की, ३१ डिसेंबर पर्यंत जिओच्या ग्राहकांची संख्या ही ३७ कोटींपर्यंत पोहोचली आहे. गेल्या १२ महिन्यात जिओने १३ कोटी ५७ लाख ग्राहक जोडले आहेत. तर एक कोटी ४८ लाख नवीन ग्राहक गेल्या तिमाहीत जोडले आहेत. या तिमाही दरम्यान जिओचा प्रति महिना प्रति सब्सक्राइबर युजर १२८.४ रूपये इतका राहिला आहे. गेल्या वर्षी हाच आकडा १२७.५ रुपये होता. आययूसी टॅरिफ लागू झाल्यानंतर २ महिन्यात अॅक्सिसला फायदा झाला आहे. या तिमाहित जिओ ग्राहकांनी एकूण १ हजार २०८ कोटी जीबी डेटाचा वापर केला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहित ३९.९ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या तिमाहित जिओच्या ग्राहकांनी ८२,६४९ कोटी मिनिट्स मोबाइलवर चर्चा केली. म्हणजेच या तिमाहीत ३०.३ टक्क्याचा फायदा झाला आहे. या तिमाहित जिओच्या ग्राहकांनी प्रत्येक महिन्याला ११.१ जीबी डेटाचा वापर केला आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2uiBbbh

Comments

clue frame