नवी दिल्ली: लाखो यूजरना हे वर्ष खूपच खर्चिक ठरणार आहे. १ फेब्रुवारीपासून व्हॉट्सअॅप अनेक स्मार्टफोनवर 'रन' होणार नाही. त्यामुळं यूजरना व्हॉट्सअॅप चॅटिंगसाठी नवीन फोन खरेदी करावा लागणार आहे. कंपनीकडून गेल्या काही महिन्यांपासून यासंदर्भात यूजरना सूचना देण्यात येत आहे. १ फेब्रुवारीपासून व्हॉट्सअॅप सपोर्ट बंद झाल्यानंतर आयओएस ७ आणि त्याहून जुन्या आयओएसवरील आयफोनमध्ये व्हॉट्सअॅप अॅक्सेस होणार नाही. १ फेब्रुवारीपासून अँड्रॉइड २.३.७ आणि त्याहून जुन्या व्हर्जन असलेल्या स्मार्टफोनमध्येही व्हॉट्सअॅप सुरू होऊ शकणार नाही. गुगलच्या नव्या आकडेवारीनुसार, जगभरात जवळपास ७५ लाख हे जुने व्हर्जन असलेले आहेत. या यूजरना व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी आता १ फेब्रुवारीआधी आपला स्मार्टफोन अपग्रेड करावा लागणार आहे. ...म्हणून हा निर्णय आवश्यक सपोर्ट बंद करण्यासंदर्भात व्हॉट्सअॅपनं स्पष्टीकरण दिलं आहे. पुढील सात वर्षांचा विचार केला तर, ज्याचे यूजर सर्वाधिक असणार आहेत, अशा ऑपरेटिंग सिस्टम्सवर आम्हाला लक्ष केंद्रीत करायचं आहे. ज्या डिव्हाइसवर व्हॉट्सअॅप सपोर्ट बंद होत आहे, त्यांचा व्हॉट्सअॅपच्या प्रवासात खूप मोठं योगदान आहे. मात्र, आता हे स्मार्टफोन जुने झाले आहेत. नवे फीचर येत असून, त्यांना ते सपोर्ट करत नाहीत. आमच्यासाठी हा निर्णय खूपच कठीण होता, मात्र, यूजरना चांगला अनुभव मिळावा यासाठी निर्णय घेणं आवश्यक होतं. विंडोज ओएससाठी सपोर्ट बंद व्हॉट्सअॅपनं ३१ डिसेंबर २०१९पासून सर्व विंडोज स्मार्टफोनसाठी सपोर्ट बंद केला आहे. यासंबंधी कंपनीनं पत्रक जारी करून माहिती दिली होती. ३१ डिसेंबर २०१९ पासून विंडोज फोन ऑपरेटिंग सिस्टम वापरू शकणार नाही आणि व्हॉट्सअॅप मायक्रोसॉफ्ट स्टोरवरही उपलब्ध नसेल, असं त्यात सांगितलं होतं.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30Bb9wh
Comments
Post a Comment