वनप्लसच्या 'या' स्मार्टफोनवर ७००० रुपयांपर्यंत डिस्काउंट

नवी दिल्लीः () या स्मार्टफोनवर तब्बल ७ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे वनप्लसचा स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. वनप्लसने ही ऑफर ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अॅमेझॉन इंडियावर सुरू केली आहे. या फोनमध्ये ट्रिपल कॅमेऱ्याचा सेटअप आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसरचे फीचर्स दिले आहेत. अॅमेझॉन इंडियावर सुरू असलेली ही ऑफर कॅश ऑन डिलिव्हरीवर दिली जात नाही. ऑनलाइन पेमेंट केल्यास ग्राहकांना ही ऑफर मिळणार आहे. हा फोन खरेदी करताना ग्राहकांनी ऑनलाइन पेमेंट केल्यास २ हजार रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. ही कॅशबॅक अॅमेझॉन पे बॅलेंसवर ग्राहकांना मिळणार आहे. तसेच जुना फोन एक्सचेंज करायचा असल्यास २ हजारांचा वेगळा कॅशबॅक मिळणार आहे. ही कॅशबॅक ऑफर सर्व डिव्हाईससाठी लागू होणार नाही. जर एसबीआय क्रेडिट कार्डवरून ईएमआयचा पर्याय निवडला तर ग्राहकांना ३ हजारांचा अतिरिक्त कॅशबॅक मिळणार आहे. असे एकूण ७ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट ग्राहकांना मिळणार आहे. वनप्लस ७टी प्रोमध्ये ६.६७ इंचाचा क्वॉड एचडी प्लस फ्लूईड अमोलेड डिस्प्ले आहे. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी फोनमध्ये ३डी कॉर्निंग गोरिला ग्लास देण्यात आला आहे. फोनमध्ये ट्रिपल कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सह १६ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि एक टेलिफोटो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा पॉप अप सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ४,०८५ एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५३ हजार ९९९ रुपये इतकी आहे.



from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2U3D5Yp

Comments

clue frame