स्मार्टफोननंतर शाओमी आता लॅपटॉप आणणार

नवी दिल्ली बाजारपेठ काबीज करणाऱ्या शाओमीने आता लॅपटॉपवर लक्ष केंद्रीत केले आहे. भारतातील नंबर १ स्मार्टफोन ब्रँड ठरल्यानंतर लवकरच लॅपटॉपची श्रेणी भारतीय बाजारपेठेत सादर करणार आहे. शाओमी इंडियाचे प्रमुख मनु कुमार जैन यांनी कंपनीच्या या नव्या योजनेची माहिती युट्युबवरून दिली आहे. नुकताच शाओमीने भारतात रेडमीबुकचा ट्रेडमार्क मिळवला होता. त्यावरून कंपनी लवकरच लॅपटॉप मार्केटमध्ये उतरेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. शाओमी इंडियाचे प्रमुख मनु कुमार जैन यांनी लॅपटॉपबाबत माहिती दिली आहे. मात्र नेमकं कधी कंपनी लॅपटॉप लाँच करेल, याची तारीख सांगितलेली नाही. मात्र या व्हिडीओमुळे शाओमीप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. स्मार्टफोनमध्ये नंबर १ शाओमी इंडियाने भारतातील स्मार्टफोन बाजारपेठेत आघाडी घेतली आहे. ताज्या आकडेवारीनुसार २०१९ मधील तिसऱ्या तिमाहीत भारतात एकूण ४ कोटी ६६ लाख फोनची विक्री केली. ज्यात शाओमी ने तब्बल १ कोटी २६ लाख फोन विक्री केल्याचा दावा केला आहे. सर्वाधिक फोन विक्री करणाऱ्या आघाडीच्या पाच कंपन्यांपैकी सॅमसंगच्या स्मार्टफोन विक्रीत मात्र घसरण झालेली दिसून आली. इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनच्या आकडेवारीनुसार शाओमी भारतातील नंबर १ कंपनी ठरली आहे. सणासुदीचा हंगाम, अमेझॉन, फ्लिपकार्ट या ई कॉमर्स कंपन्यांच्या सवलत योजनांची स्मार्टफोन विक्रीत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. २०१९ मध्ये शाओमीचा स्मार्टफोन बाजारपेठेत २८ टक्के हिस्सा होता. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये त्यात ५ टक्के वाढ झाली. आता भारत ही शाओमीसाठी चीनपेक्षाही मोठी बाजारपेठ ठरली आहे.


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38GVOx0

Comments

clue frame