'या' गोष्टींना गुगल, अॅमेझॉनच्या ऑफिसमध्ये मनाई

मुंबई: गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉनसारख्या मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना चांगल्या पगारासह ऑफिस कल्चरही छान असावे यासाठी प्रयत्नात असतात. त्यांच्या अनेक गोष्टीही व्हायरल झाल्या आहेत. कर्मचाऱ्यांना तणाव मुक्त वातावरणात काम करण्यासाठी वेगवेगळ्या सोयी कंपनी देत असतात. मात्र, या कंपन्यांमध्ये काही विचित्र नियमही आहेत. ज्याचे पालन कर्मचाऱ्यांना करावे लागते. जाणून घेऊयात हे ... >> अॅमेझॉनमध्ये पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन करण्यास मनाई अॅमेझॉनमध्ये पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन करण्यास मनाई असल्याचे अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांनी सांगितले. जो कर्मचारी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन करतो त्याला सहा पानी मेमो दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. >> मायक्रोसॉफ्टमध्ये गुगल डॉक्सला बंदी खरंतर गुगल डॉक्स वापरण्यावर थेट बंदी नाही. मात्र, जो कर्मचारी हे अॅप वापरतो त्याला 'व्यावसायिक कारण' देत हे अॅप का वापरत आहात, याचे स्पष्टीकरण द्यावे लागते. आता या जाचात अडकण्यापेक्षा कर्मचारी गुगल डॉक्स वापरतच नाहीत. >> इथे राजकीय चर्चांना बंदी राजकारण आणि क्रिकेट हे आपणा भारतीयांचे आवडते विषय. यावर भारतीय म्हणून सर्वाधिकाराने बोलू शकतो. राजकारणावर तर ऑफिसात चर्चा झडल्या जातात. मात्र, गुगलने मागील वर्षापासून ऑफिसमध्ये राजकीय गप्पा, वादविवाद करण्यास मनाई आणली आहे. आपण ज्या कामासाठी आले आहोत ते काम करावे आणि कामाच्या बाबतीत काही वादविवाद करण्यास हरकत नाही असेही गुगलने म्हटले आहे. >> या ऑफिसमध्ये आयफोनला बंदी आयफोन म्हणजे सध्या अनेकजणांसाठी स्टेट्स सिम्बॉल झाले आहे. मात्र, फेसबुकच्या ऑफिसमध्ये आयफोन वापरण्यास मनाई आहे. ही बंदी पूर्णपणे अधिकृत नाही. काहींच्या मते फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि अॅपलचा सीईओ टीम कुक यांच्यात वाद असल्यामुळे ही मनाई आहे. मात्र, कंपनीने अधिकृतपणे सांगताना हा दावा फेटाळला. फेसबुकने म्हटले की, आमच्या कंपनीतील कर्मचारी, अधिकारी हे अॅण्ड्रॉइड फोन वापरतात. अॅण्ड्रॉइड फोन जगातील सर्वात लोकप्रिय मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम असल्याचे फेसबुकने म्हटले. >>'ग्रामर' तपासण्यास बंदी मायक्रोसॉफ्टमध्ये कर्मचाऱ्यांना काम करत असताना शब्द, व्याकरण तपासणाऱ्या अॅपचा वापर करण्यास बंदी आहे. >> पेन ड्राइव्ह वापरण्यास बंदी आयबीएम कंपनीमध्ये एसडी कार्ड, पेन ड्राइव्ह वापरण्यास बंदी आहे. आयबीएमने २०१८ मध्ये याची माहिती दिली होती. >> टेलिग्रामवर बंदी उबरमध्ये टेलिग्राम अॅप वापरण्यास मनाई आहे. काही वर्षाआधी उबरच्या सीईओंनी याची माहिती दिली होती. >> टेस्लामध्ये 'यावर' बंदी टेस्ला कंपनीने कर्मचाऱ्यांना ब्लाइंड अॅप वापरण्यास बंदी घातली आहे. अॅपच्या माध्यमातून कर्मचारी कंपनीबाबत चर्चा करत असल्यामुळे ही बंदी घालण्यात आली. >> हवामान बदल चर्चेवर बंदी अॅमेझॉनने आपल्या कंपनीत आपल्या कंपनीमुळे हवामान बदल कसा होतोय यावर चर्चा करण्यास मनाई केली असल्याचे वृत्त होते. >> स्लॅक अॅपवर बंदीमायक्रोसॉफ्टने स्लॅक अॅपचे फ्री व्हर्जन वापरण्यास मनाई केली आहे.


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2THtZA7

Comments

clue frame